Google  Sakal
Personal Finance

Google Employees Salaries: गुगलच्या कर्मचाऱ्यांचा पगार ऐकून बसेल धक्का, माहिती झाली लीक

Data Leak : Google कर्मचार्‍यांना किती वेतन मिळते याचा तपशील आता उघड झाला आहे.

राहुल शेळके

Google Employees Salaries Leak : Google कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना चांगल्या पगार देण्यासाठी ओळखली जाते आणि बिझनेस इनसाइडरवर प्रकाशित झालेल्या अहवालात 2022 मध्ये कोणत्या कर्मचार्‍यांना किती वेतन मिळाले याचा तपशील आता उघड झाला आहे.

बिझनेस इनसाइडरने ऍक्सेस केलेल्या Google च्या अंतर्गत स्प्रेडशीटमध्ये असे म्हटले आहे की कंपनीमधील सॉफ्टवेअर इंजीनियरला 2022 मध्ये सर्वाधिक वेतन मिळाले होते, त्यांना मूळ वेतन 5.9 कोटी रुपये होते. अभियांत्रिकी व्यवस्थापकांना 3.28 कोटी रुपयांचा पगार मिळाला.

एंटरप्राइझ डायरेक्ट सेल्स आणि लीगल कॉर्पोरेट काउंसिल टीममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 3.09 कोटी रुपये आणि 2.62 कोटी रुपये बेस सॅलरी मिळाली आहे.

अहवालानुसार, 2022 मध्ये प्रोग्रॅम मॅनेजमेंटला सर्वात कमी मूळ वेतन 2.46 कोटी रुपये मिळाले. एकूण, स्प्रेडशीटमध्ये 12,000 Google कर्मचार्‍यांचे तपशील समाविष्ट होते.

2022 मध्ये गुगलमधील एका कर्मचाऱ्याला मिळवलेला सरासरी पगार 2.3 कोटी रुपये असल्याचे आढळून आले. पगारा व्यतिरिक्त, Google च्या कर्मचाऱ्याला इतर बोनस देखील दिला जातो.

Google कर्मचार्‍यांचा पगार

12.30 कोटी पर्यंत कमाई

सॉफ्टवेअर इंजिनीअर्सबद्दल बोलायचे तर 2022 मध्ये त्यांना कंपनीमध्ये 1.5 दशलक्ष डॉलर म्हणजेच 12.30 कोटी रुपयांपर्यंतचा पगार मिळवण्याची संधी मिळाली.

हा आकडा फक्त अमेरिकेतील पूर्णवेळ कर्मचार्‍यांसाठी आहे आणि गुगलच्या भागीदार कंपन्यांचा त्यात समावेश नाही. तसेच, लीक झालेला डेटा काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे आणि बहुतेक कर्मचाऱ्यांनी त्यांचे वेतन उघड करण्यावर आक्षेप घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT