Google Pay to Begin Collecting Convenience Fee on Mobile Recharge Transactions  Sakal
Personal Finance

Google Pay: ग्राहकांना मोठा धक्का! आता रिचार्ज केल्यावर गुगल पे सुद्धा घेणार जादा पैसे

Google Pay: गुगलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही

राहुल शेळके

Google Pay: भारतातील Google Pay वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गुगल पे मोबाईल रिचार्जसाठी वेगळे पैसे आकारणार असल्याची बातमी आहे. अनेक वापरकर्त्यांनी दावा केला आहे की त्यांनी Google Pay वर सुविधा शुल्काच्या नावाखाली पैसे घेणे सुरू केले आहे.

आतापर्यंत गुगल पेद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नव्हते, परंतु आता तुम्हाला ते द्यावे लागणार आहेत.

गुगलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र अनेक सोशल मीडिया यूजर्सने हा दावा केला आहे. PhonePe आणि Paytm या कंपन्या मोबाइल रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारत आहेत.

जेव्हा या कंपन्यांनी रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली तेव्हा Google ने सांगितले होते की त्यांच्या Google Pay वर मोबाइल रिचार्जवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकरले जाणार नाही.

मुकुल शर्मा यांनी ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये Jio च्या 749 रुपयांच्या रिचार्जसाठी, Google Pay 752 रुपये आकारत आहे. ज्यामध्ये सुविधा शुल्क म्हणून 3 रुपये जोडले आहेत. हे सुविधा शुल्क अॅपद्वारे UPI आणि कार्ड पेमेंट मोडमध्ये भरावे लागेल.

रिपोर्टनुसार, 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रिचार्जसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. 200-300 रुपयांपर्यंतच्या रिचार्जसाठी 2 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रिचार्जसाठी 3 रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT