Free LPG Connection Sakal
Personal Finance

Free LPG Connection: गॅस सिलिंडरनंतर मोदी सरकाराचं आणखी एक गिफ्ट! 75 लाख मोफत LPG कनेक्शन देणार

Free LPG Connection: उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन एलपीजी कनेक्शनला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

राहुल शेळके

Free LPG Connection: सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना एलपीजी कनेक्शन देण्यासाठी अनुदान जारी करण्यास मान्यता दिली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन एलपीजी कनेक्शनला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत 1,650 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने 33 कोटी ग्राहकांच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी केल्या होत्या.

उज्ज्वला योजनेंतर्गत ग्राहकांना 400 रुपये प्रति सिलिंडर स्वस्त मिळत आहेत. आता 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयांची घोषणा करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, "आज दोन निर्णय घेण्यात आले. पहिला निर्णय पुढील तीन वर्षांत म्हणजे 2026 पर्यंत 75 लाख मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहेत."

अनुराग ठाकूर म्हणाले, "दुसरा निर्णय म्हणजे 7,120 कोटी रुपयांच्या ई-कोर्ट्स मिशन मोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला मान्यता देण्यात आली आहे. ऑनलाइन आणि पेपरलेस न्यायालये निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक होईल."

उज्ज्वला योजना 2.0 चा फायदा कोणाला होणार?

  • PMUY वेबसाइटनुसार, गरीब कुटुंबातील प्रौढ महिला ज्यांच्या घरात LPG कनेक्शन नाही ती उज्ज्वला 2.0 योजनेअंतर्गत पात्र मानली जाईल. या योजनेचे लाभार्थी खालीलपैकी कोणत्याही एका श्रेणीतील असणे आवश्यक आहे.

  • सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना 2011 अंतर्गत समाविष्ट महिला यासाठी पात्र असतील.

  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोक, प्रधानमंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, सर्वात मागासवर्गीय, पूर्वीच्या चहाच्या बागेतील जमाती, नदी बेटांवर राहणारे लोक (लाभार्थी आवश्यक सहाय्यक कागदपत्रे सादर करतील).

  • जर एखादी महिला वरील दोन श्रेणींमध्ये येत नसेल, तर ती गरीब कुटुंबांतर्गत लाभार्थी असल्याचा दावा करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT