Growth rate seven percent Fitch Ratings predicts rising domestic demand Sakal
Personal Finance

Fitch Ratings : विकासदर सात टक्क्यांवर; देशांतर्गत वाढत्या मागणीमुळे ‘फिच रेटिंग्ज’चा अंदाज

भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड अशीच कायम राहील, असा विश्वास जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने व्यक्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड अशीच कायम राहील, असा विश्वास जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने व्यक्त केला आहे. फिचने देशांतर्गत वाढत्या मागणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा पुढील आर्थिक वर्षासाठी विकासदराचा सुधारित अंदाज गुरुवारी जाहीर करत तो सात टक्क्यांवर नेला आहे.

फिच रेटिंग्जच्या सुधारित अहवालानुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ८.४ टक्के राहिले. तसेच २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांनी विस्तारत असल्याचे समोर आले. जो केंद्र सरकारच्या ७.६ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. आगामी आर्थिक वर्षात देशांतर्गत मागणी, देशातील गुंतवणूक,

व्यवसाय आणि ग्राहकांची खरेदी क्षमता या सर्व कारणांमुळे ही वाढ होण्याचा अंदाज फिचने वर्तविली आला आहे. जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच’ने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार,

मजबूत देशांतर्गत मागणीमुळे गेल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरीही वाढ दाखविणारी राहिली आहे. या आधारे गुंतवणूक वृद्धी दर १०.६ टक्के आणि खासगी उपभोग ३.५ टक्क्यांहून अधिक राहिला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असल्याचे संकेत आहेत.

चीनच्या विकासदरात कपात

‘फिच’ने २०२४ चा जागतिक विकास दराचा अंदाज ०.३ टक्क्यांनी वाढवून २.४ टक्क्यांवर नेला आहे. कारण नजीकच्या काळात जागतिक विकासाच्या शक्यता सुधारल्या आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये वर्तविण्यात आलेला अमेरिकेचा विकासदर १.२ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला असून दुसरीकडे चीनच्या विकासदराच्या अंदाजात किरकोळ कपात करण्यात आली. हा विकासदर ४.६ टक्क्यांवरून ४.५ टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT