GST Collection Sakal
Personal Finance

GST Collection: मार्चमध्ये झाले दुसरे सर्वात मोठे जीएसटी संकलन; 2023-24चे उत्पन्न 1.78 लाख कोटींच्या पुढे

March GST Collection: मार्चमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त जीएसटी संकलन झाले आहे. सरकारकडून जीएसटी संकलनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मार्चमध्ये जीएसटी संकलन 11.5% ने वाढून 1.78 लाख कोटी रुपये झाले आहे.

राहुल शेळके

March GST Collection: मार्चमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त जीएसटी संकलन झाले आहे. सरकारकडून जीएसटी संकलनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मार्चमध्ये जीएसटी संकलन 11.5% ने वाढून 1.78 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जीएसटी संकलनात ही वाढ देशांतर्गत व्यवहारांमध्ये 17.6% वाढ झाल्यामुळे झाली आहे.

मार्चमधील जीएसटी संकलनाचे आकडे

  • केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): रु. 34,532 कोटी

  • राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST): रु. 43,746 कोटी

  • एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST): रु. 87,947 कोटी (आयात केलेल्या वस्तूंमधून गोळा केलेल्या रु. 40,322 कोटींसह)

दुसरे सर्वात मोठे GST संकलन

जीएसटी संकलनाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 9 महिन्यांच्या सरासरीपेक्षा यावेळी जीएसटी संकलन अधिक झाले. हा जीएसटी संकलनाचा विक्रम आहे.

एका महिन्यात सर्वाधिक GST संकलनाचा विक्रम एप्रिल 2023 च्या नावावर आहे, जेव्हा हा आकडा 1.87 लाख कोटी रुपयांच्या उंचीवर पोहोचला होता. म्हणजेच आकड्यांचा विचार करता हे दुसरे सर्वात मोठे GST संकलन आहे.

गेल्या 6 महिन्यांत जीएसटी संकलन

  • ऑक्टोबर, 2023: ₹1.72 लाख कोटी

  • नोव्हेंबर, 2023: ₹1.67 लाख कोटी

  • डिसेंबर 2023: ₹1.65 लाख कोटी

  • जानेवारी, 2024: ₹1.72 लाख कोटी

  • फेब्रुवारी, 2024: ₹1.68 लाख कोटी

  • मार्च, 2024: ₹1.78 लाख कोटी

गेल्या आर्थिक वर्षातील कामगिरी कशी होती?

गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये एकदा जीएसटी संकलनाचा आकडा 1.8 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचला होता.

याशिवाय, मे 2023 आणि ऑगस्ट 2023 वगळता, गेल्या आर्थिक वर्षातील प्रत्येक महिन्यातील संकलनाचा आकडा 1.6 लाख कोटी रुपयांच्या वर आहे. एप्रिल 2023 च्या विक्रमी संकलनासह, ऑक्टोबर 2023, जानेवारी 2024, मार्च 2024 मधील संकलनाने 1.7 लाख कोटी रुपयांची पातळी ओलांडली.

2017 मध्ये GST लागू करण्यात आला

जुनी अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलून 1 जुलै 2017 रोजी देशभरात वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर देशातील ही सर्वात मोठी कर सुधारणा मानली जात आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, सहा वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे देशातील लोकांवरील कराचा बोजा कमी होण्यास मदत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT