GST Collection Sakal
Personal Finance

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

GST Revenue Collection: देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाच्या आकडेवारीने सर्व विक्रम मोडले आहेत आणि सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. एप्रिल 2024 मध्ये जीएसटी संकलन 2.10 लाख कोटी रुपये झाले आहे.

राहुल शेळके

GST Collection: देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाच्या आकडेवारीने सर्व विक्रम मोडले आहेत आणि सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. एप्रिल 2024 मध्ये जीएसटी संकलन 2.10 लाख कोटी रुपये झाले आहे. यावेळी जीएसटी संकलनातून मोठा महसूल मिळाला असून सरकारची तिजोरी भरली आहे.

एका महिन्यात प्रथमच GST महसूल 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. एप्रिल 2024 मध्ये जीएसटी संकलन 2.10 लाख कोटी रुपये होते, जे ऐतिहासिक संकलन आहे. स्थूल महसुलात वर्ष-दर-वर्ष आधारावर 12.4 टक्के वाढ झाली आहे. परताव्यानंतरचा निव्वळ महसूल पाहिल्यास, तो 1.92 लाख कोटी रुपये आहे, जो वार्षिक आधारावर 17.1 टक्क्यांनी वाढला आहे.

विक्रमी GST संकलनामुळे सरकार खूप खूश आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही आकडेवारी त्यांच्या X खात्यावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे. वस्तू आणि सेवा कर संकलनात ही वाढ देशांतर्गत व्यवहारांमध्ये 13.4 टक्क्यांच्या वाढीनंतर दिसून आली आहे आणि आयातीमध्येही 8.3 टक्के वाढ झाली आहे.

GST संकलनाची आकडेवारी

  • केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): रु. 43,846 कोटी

  • राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST)- रु. 53,538 कोटी;

  • एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST) - रु. 99,623 कोटी, ज्यापैकी रु. 37,826 कोटी आयात केलेल्या वस्तूंमधून जमा झाले.

  • उपकर: रु. 13,260 कोटी, ज्यापैकी रु. 1008 कोटी आयात वस्तूंमधून जमा झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने रचला इतिहास, एका दिवसात ५ हजारांची वाढ, चांदीही तेजीत; जाणून घ्या आजचा ताजा भाव

चाकाखाली लिंबू ठेवला, मी चालवणार म्हणत तरुणीने स्टेअरिंग घेतलं हातात; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून कोसळली, Video Viral

Latest Marathi News Updates : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांनी एकजूट दाखवली - संजय राऊत

Indian Railway: रेल्वेच्या जागांचा व्यावसायिक वापर; महालक्ष्मी, वांद्रे येथील जमिनी कोटी रुपयांच्या भाडेतत्त्वावर

Shoumika Mahadik : शौमिका महाडिकांच्या एका वाक्याने भाकरी फिरणार? गोकुळ दूध संघात सभासदांचे गट्टा मतदान असलेल्या आबाजी पुढच्या निवडणुकीत कोणासोबत

SCROLL FOR NEXT