GST Council 
Personal Finance

GST Council: ऑनलाईन गेमिंगवर लागणार २८% कर, सिनेमागृहांमधील खाण्यापिण्यावरील जीएसटीत कपात

Sandip Kapde

GST Council: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कौन्सिलने ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. तसेच खासगी संस्थांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या उपग्रह प्रक्षेपण सेवेसाठी GST वर सूट देण्यात आली आहे. GST कौन्सिलच्या 50 व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली.

ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवर 28% कर आकारला जाईल. जीएसटी कौन्सिलने सिनेमागृहांमधील खाण्यापिण्यावरील जीएसटीचा दर कमी करण्यात येणार असल्याचे देखील म्हटले आहे.

तसेच ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि घोड्यांच्या शर्यतींना जुगार आणि सट्टेबाजीप्रमाणे कारवाई करता येणार नाही याची खात्री करण्यासाठी जीएसटी कायद्यात आवश्यक बदल केले जातील.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, परिषदेने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या डिनुटक्सिमॅब औषध आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या विशेष औषधी अन्न उत्पादन (FSMP) च्या आयातीवर GST मधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जीएसटी कौन्सिलने ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीत कौशल्याचा खेळ आणि नशिबाचा खेळ यातील फरक न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, या तीन गेममधील सट्टेबाजीच्या संपूर्ण रकमेवर 28 टक्के दराने कर आकारला जाईल. याशिवाय, जीएसटी परिषदेने अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली.

याशिवाय बैठकीत निर्णय घेताना जीएसटी कौन्सिलने सिनेमागृहांमधील खाण्यापिण्यावरील जीएसटीचा दर कमी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सिनेमागृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर यापूर्वी १८ टक्के जीएसटी आकारला जात होता, मात्र आता तो कमी करून ५ टक्के करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाला आज जीएसटी कौन्सिलमध्येही मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT