Finance ministers announce GST reform, restricting tax structure to two slabs: 5% and 18%. E sakal
Personal Finance

GST tax slabs : 'जीएसटी' बैठकीत मोठा निर्णय ; आता फक्त दोनच टॅक्स स्लॅब असणार

GST meeting : जाणून घ्या, नेमके कोणते टॅक्स स्लॅब असणार आणि कोणते टॅक्स स्लॅब रद्द झाले?

Mayur Ratnaparkhe

GST latest news : जीएसटी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. बुधवारी नवी दिल्ली येथे GST परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

तर या बैठकीनंतर, उत्तर प्रदेशच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की आता फक्त ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच GST स्लॅब असतील. याचाच अर्थ आता १२ आणि २८ टक्केचे GST स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. परिणामी त्यामध्ये समाविष्ट असलेल्या बहुतेक गोष्टी फक्त दोनच मंजूर टॅक्स स्लॅबमध्ये येतील आणि अनेक वस्तू स्वस्त होण्याचीही चिन्ह आहेत.

१५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सुधारणा केली होती, त्यानंतर ही पहिलीच परिषदेची बैठक होती ज्यामध्ये मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर प्रदेशच्या अर्थमंत्र्यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांबद्दल माहिती देताना ५ आणि १८ टक्केच्या GST स्लॅबला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. यासोबतच त्यांनी हेही सांगितले की, परिषदेच्या बैठकीत घेतलेले सर्व निर्णय २२ सप्टेंबरपासून लागू केले जातील.

जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार जीएसटीच्या चार स्लॅब ऐवजी आता दोन स्लॅब करण्यात आले आहेत. १२टक्के आणि २८टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे, १२ टक्के स्लॅबमध्ये समाविष्ट असलेल्या सुमारे ९९टक्के वस्तू आता ५ टक्के स्लॅबमध्ये जातील, तर २८टक्के जीएसटी स्लॅबमध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी १८टक्के स्लॅबमध्ये आणण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission: जेवढा उशीर तेवढा फायदा! एकरकमी मिळणार 6,00,000 रुपये, किती असेल फिटमेंट फॅक्टर?

AUS vs IND: तीन स्पिनर्स, एक वेगवान गोलंदाज... पहिल्या T20I साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update: महापालिकेतर्फे मेट्रो प्रवाशांसाठी बाणेर-बालेवाडीत चार पार्किंग

World Cup 2025: भारताचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार करणार पुनरागमन, झळकावली सलग दोन शतकं

BSNL Vacancy 2025 : फ्रेशर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 50 हजारांपर्यंत बेसिक सॅलरी

SCROLL FOR NEXT