7th Pay Commission Sakal
Personal Finance

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने महागाई भत्त्यात 4 नव्हे 8 टक्क्यांनी केली वाढ

सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा निर्णय घेतला आहे.

राहुल शेळके

7th Pay Commission DA Hike: सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 8 टक्के करण्यात आला आहे. ही वाढ गुजरात सरकारने केली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही मोठी वाढ केली आहे.

केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात वाढ करताना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना 42 टक्के डीएचा लाभ दिला जात आहे. ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.

किती लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा?

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की याचा फायदा 9.50 लाख पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

या वाढीमुळे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार असल्याचे भूपेंद्र पटेल यांनी सांगितले. राज्य सरकारने महागाई भत्त्यात एकाच वेळी दोनदा वाढ केली आहे.

8 टक्के डीए वाढ:

महागाई भत्त्यात 8 टक्के वाढ दोन भागात विभागली गेली आहे. पहिली वाढ 1 जुलै 2022 पासून करण्यात आली आणि त्यात 4 टक्के वाढ झाली आहे.

दुसरीकडे 1 जानेवारी 2023 पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर दुसरी वाढ करण्यात आली असून त्यातही 4 टक्के वाढ झाली आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा एकूण डीए 8 टक्क्यांनी वाढणार आहे.

'या' राज्यातही डीए वाढ:

केंद्र सरकारपाठोपाठ तामिळनाडू सरकारनेही नुकतीच डीए वाढ केली आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम आणि इतर काही राज्यांमध्ये 3 टक्के महागाई भत्ता वाढवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT