HDFC Manufacturing Fund  sakal
Personal Finance

HDFC Manufacturing Fund : एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंड योजना आज खुली होणार ; उत्पादन क्षेत्रातील वाढीच्या लाभाची संधी

एचडीएफसी म्युच्युअल फंडाने एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंड योजना दाखल केली आहे. ही योजना शुक्रवारी (ता.२६) खुली होणार असून, ती १० मे रोजी बंद होईल.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एचडीएफसी म्युच्युअल फंडाने एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंड योजना दाखल केली आहे. ही योजना शुक्रवारी (ता.२६) खुली होणार असून, ती १० मे रोजी बंद होईल. उत्पादन क्षेत्रातील संभाव्य वाढीचा लाभ मिळवणे हा या ओपन-एंडेड इक्विटी योजनेचा उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर आणि शेअरसंबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. या योजनेचे व्यवस्थापन राकेश सेठिया करणार आहेत.

एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे ​​व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुनोत म्हणाले, ‘‘ग्राहकांच्या वेगवेगळ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी आम्ही विविध योजनांद्वारे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

उत्पादन क्षेत्रातील वाढीचा फायदा घेण्यासाठी तयार असलेल्या कंपन्या निवडून त्यांच्या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे आणि चांगला परतावा मिळवून देणे हा या फंडाचा उद्देश आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : तिकिटाच्या वादातून एसटी वाहकाला बेदम मारहाण; हिंगोली डेपो बंद ठेवत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT