Fixed Deposit google
Personal Finance

Fixed Deposit : मुदत ठेवींचे व्याजदर वाढले; ही बँक देतेय ९.११ टक्के व्याज

७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या FD वर, बँक सामान्य ग्राहकांना 3 ते 7 टक्के व्याजदर देत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सरकारी असो की खासगी, सर्व बँका मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवत आहेत. आता आणखी एका सरकारी बँकेने एफडीवर दर वाढवला आहे.

बँक ऑफ इंडियाने एका वर्षाच्या मुदतीसह एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने या एफडीवरील व्याजदर ७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. २ कोटींपेक्षा कमी ठेवींवर किरकोळ ग्राहकांसाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. (highest interest rates on fixed deposit )

तुम्हाला ७.६५% पर्यंत व्याज मिळू शकते

७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या FD वर, बँक सामान्य ग्राहकांना 3 ते 7 टक्के व्याजदर देत आहे. बँक एक वर्षाच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के व्याजदर देत आहे. वाढलेले व्याजदर देशांतर्गत, NRO आणि NRE ठेवींवर लागू आहेत.

फिनकेअर बँक उत्तम एफडी दर देत आहे

स्मॉल फायनान्स बँका देखील FD वर अतिशय आकर्षक व्याजदर देतात. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर (फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक एफडी दर) व्याजदर बदलले आहेत. नवीन एफडी दर 25 मे पासून लागू होणार आहेत. आता सर्वसामान्य नागरिकांना 1000 दिवसांच्या FD वर 8.51% व्याजदर मिळू शकतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.11% व्याजदर

1000 दिवसांच्या FD साठी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 9.11 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. FD वर हा व्याजदर मिळविण्यासाठी किमान ठेव मर्यादा रु 5,000 आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 84 महिन्यांपर्यंतच्या एफडीवर 3.60 टक्के ते 9.11 टक्के व्याजदर देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT