increase in annual sales of houses  Sakal
Personal Finance

Housing Sales: राज्यातील 'या' शहरांमध्ये घरांच्या मागणीत विक्रमी वाढ, किती वाढल्या किंमती?

Housing Demand: भारतात घरांची मागणी झपाट्याने वाढत आहे. 2023 हे वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रासाठी चांगले गेले होते. आता 2024 मध्येही अशीच परिस्थिती आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घरांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Housing Demand: भारतात घरांची मागणी झपाट्याने वाढत आहे. 2023 हे वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रासाठी चांगले गेले होते. आता 2024 मध्येही अशीच परिस्थिती आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घरांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. देशातील टॉप 7 शहरांमध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान 1.30 लाखांहून अधिक घरांची विक्री झाली. वार्षिक आधारावर विक्रीत सुमारे 14 टक्के वाढ झाली आहे. 2023 च्या पहिल्या तिमाहीत 1.13 लाखांहून अधिक घरांची विक्री झाली.

चांगल्या मागणीमुळे, या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत 14 टक्के वाढ झाली आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (MMR), पुणे, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये निवासी मालमत्तेची विक्री वाढली, दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR), चेन्नई आणि कोलकाता शहरांमध्ये विक्रीत घसरण झाली. रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकने बुधवारी देशातील टॉप सात शहरांतील घरांच्या विक्रीचा डेटा जाहीर केला.

आकडेवारीनुसार, या वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत पहिल्या सात शहरांमधील घरांची विक्री 14% ने वाढून 1,30,170 युनिटवर पोहोचली आहे, मागील वर्षी याच कालावधीत 1,13,775 युनिट होती. अनारॉकचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले की, 1.5 कोटी आणि त्याहून अधिक किंमतीच्या घरांच्या मागणीत वाढ झाल्याने या तिमाहीत गेल्या दशकातील सर्वाधिक घरांची विक्री झाली आहे.

पुण्यातील घरांची विक्री 15% वाढून 19,920 युनिटवरून 22,990 युनिटवर पोहोचली. हैदराबादमधील घरांची विक्री 14,280 युनिटवरून 38% वाढून 19,660 युनिट झाली.

बेंगळुरूमध्ये 15,660 युनिटवरून 17,790 युनिटवर 14% वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआरमधील निवासी विक्री 17,160 युनिटवरून 9% कमी होऊन 15,650 युनिटवर आली आहे.

कोलकात्यातील निवासी विक्री 6,185 युनिटवरून 9% कमी होऊन 5,650 युनिटवर आली आणि चेन्नईमध्ये गेल्या वर्षी याच कालावधीतील 5,880 युनिटवरून 9% ने कमी होऊन 5,510 युनिटवर आली.

2024 च्या पहिल्या तिमाहीत पहिल्या सात शहरांमधील सरासरी निवासी मालमत्तेच्या किंमती दरवर्षी 10 ते 32% वाढण्याची अपेक्षा आहे. या अहवालावर भाष्य करताना सिग्नेचर ग्लोबलचे अध्यक्ष प्रदीप अग्रवाल यांनी सांगितले की, मोठ्या मागणीमुळे विक्री वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT