how to understand budget in easy way finance minister nirmala sitharaman  Sakal
Personal Finance

Budget 2024: अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजून घ्यायचा आहे? मग तुम्ही हे वाचायलाच हवं

Budget 2024: देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार नाही. पण निवडणुकीच्या वर्षांत सरकार मोठ्या घोषणा करू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Budget 2024: देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार नाही. पण निवडणुकीच्या वर्षांत सरकार मोठ्या घोषणा करू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. देशभरात अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प अत्यंत विशेष मानला जात आहे.

पण अनेकांना अर्थसंकल्प म्हणजे काय आणि तो कसा समजून घ्यायचा, याची माहिती नसते. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. ( Budget 2024 how to understand budget in easy way read story )

अर्थसंकल्प म्हणजे काय?

अर्थसंकल्प हा एक वार्षिक आर्थिक दस्तऐवज असतो ज्यामध्ये प्रत्येक मंत्रालयाला येणाऱ्या वर्षाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एक निश्चित रक्कम दिली जाते. अर्थसंकल्प तीन श्रेणीत विभागला जातो.

१. संतुलित अर्थसंकल्प ( Balanced budget )

संतुलित अर्थसंकल्पामध्ये म्हणजे अर्थसंकल्प महसूल खर्चाच्या बरोबरीचा असतो, 

२. अतिरिक्त अर्थसंकल्प (Additional budget )

अपेक्षित महसूल अपेक्षित खर्चापेक्षा जास्त असतो तेव्हा त्या बजेटला अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणतात.

३. तूट अर्थसंकल्प (Deficit budget).

जेव्हा अंदाजे खर्च अंदाजित महसुलापेक्षा जास्त असतो तेव्हा अर्थसंकल्प तुटीत असतो, त्यालाच तूटीचा अर्थसंकल्प म्हणतात.

अर्थसंकल्प सोप्या भाषेत कसा समजून घ्यायचा?

  • मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षातील प्रगती किंवा अधोगती कशी आणि कितपत आहे … त्याची संभाव्य कारणे काय आहेत? कोणकोणत्या खात्यांना किती निधीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तरतुदीशी आणि प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या प्रमाणात ती जास्त आहे का कमी आहे आणि किती आहे? याचा विचार महागाईचा दर लक्षात घेऊन केला पाहिजे.

  • होणाऱ्या एकूण खर्चाची रक्कम सरकार कशी उभारणार आहे? जमा होणाऱ्या रकमांचे स्वरूप काय आहे? सरकारचे निर्गुंतवणूक आणि गुंतवणूक विषयक धोरण काय आहे आणि त्याचे लक्ष काय ठेवले आहे. जमेच्या बाजूला जर देशांतर्गत किंवा विदेशातून कर्ज घेणे प्रस्तावित असेल तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात हे कर्ज किती आहे? याचा अभ्यास करावा.

  • थेट विकासकामासाठी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केलेली तरतूद (हवाई वाहतूक, जलवाहतूक, राष्ट्रीय महामार्ग, लोहमार्गांची बांधणी तसेच विद्युतनिर्मिती प्रकल्प, धरणबांधणी वगैरे) साठी किती तरतूद केली आहे. चलन फुगवटा किती आहे? याविषयी जाणून घेणे.

  • अर्थसंकल्पात जरी विकास हे ध्येय धरले असले तरीही तो रोजगाराभिमुख हवा म्हणजे रोजगार निर्मिती व्हायला हवी.

  • अर्थसंकल्पात निर्यातीसाठी काही प्रोत्साहन कितपत आहे? भारताच्या अर्थसंकल्पात कृषीविषयक तरतूद कितपत केली आहे? प्रत्यक्ष करात काय बदल झाला आहे? अप्रत्यक्ष करात काय बदल झाला आहे?

  • कोणत्या वस्तूंवर सबसिडी वाढवण्यात आली आहे तर कोणत्या वस्तूंवर कमी करण्यात आली आहे? आर्थिकदृष्ट्या दुर्बल उद्योगांसाठी काही विशेष तरतूद किंवा सवलत देण्यात आली आहे का? अशा अनेक वेगवेगळ्या दृष्टीतून अर्थसंकल्पाकडे बघावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Kolhapur Crime News : हुपरीत मुलानेच आई-वडिलांचा खून करण्याचं खर कारण आलं समोर, पहाटे पाणी भरत असलेल्या निरागस आईच्या गळ्यावर काच मारली अन्

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात आणखी तिघांची किडनी काढली

Parbhani News: शेती गमावण्याचा धक्का! दारू पाजून फसवणूक केल्याच्या तणावातून शेतकऱ्याने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT