ICICI  
Personal Finance

ICICI Bank FD: ग्राहकांसाठी खुशखबर! ICICI बँकेने केली FD च्या व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

नवीन व्याजदर 24 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ICICI Bank Latest FD Rates in 2023 : खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने मोठ्या प्रमाणात मुदत ठेव दर बदलले आहेत. नवीन व्याजदर 24 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. आता बल्क एफडीवर किमान व्याज दर 4.75 टक्के आणि कमाल व्याज दर 7.25 टक्के आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी, बल्क एफडीवरील किमान व्याज दर 4.75 टक्के आणि कमाल दर 7.25 टक्के करण्यात आला आहे. किरकोळ मुदत ठेवीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. बँकेने शेवटचा रिटेल एफडी दर 24 फेब्रुवारी रोजी बदलला होता.

मोठ्या प्रमाणात ठेवींवर नवीन व्याजदर :

ICICI बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जर आपण बल्क फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणजेच 2 कोटी ते 5 कोटी पर्यंतच्या FD च्या नवीन दराबद्दल बोललो तर 7-29 दिवसांसाठीचा दर 4.75 टक्के झाला आहे.

30-45 दिवस 5.50%, 46-60 दिवस 5.75%, 61-90 दिवस 6%, 91-184 दिवस 6.50%, 185-270 दिवस 6.65% आणि 271 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी त्यावर वार्षिक व्याज 6.75 टक्के मिळणार आहे.

1 वर्षाच्या मुदत ठेवीवर 7.25% व्याज :

1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.25%, 15 महिने ते 2 वर्षांपर्यंतच्या FD वर 7.15%, 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षांच्या FD वर 7% व्याज मिळेल. 3 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.75 टक्के व्याज दिले जात आहे.

रिटेल एफडीवर किती व्याज मिळत आहे :

सध्या, ICICI बँक किरकोळ मुदत ठेवींवर सर्वसामान्यांना किमान 3% आणि कमाल 7.10% व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना किमान 3.50 टक्के आणि 7.50 टक्के व्याज दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's Likely Squad For AUS Tour : सूर्यकुमार यादव IN, रोहित, विराटची एन्ट्री; जसप्रीत बुमराह, शुभमन गिल यांना विश्रांती

Diwali 2025: यंदा दिवाळी 20 कि 21 ऑक्टोबर? जाणून घ्या 5 दिवसांच्या दिपत्सोवसाची संपूर्ण यादी

D-Mart Income: बापरे! डीमार्टची 'ही' फक्त तीन महिन्यांची कमाई… आकडा वाचून थक्क व्हाल

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकण आता नाही राहिलं, एकनाथ शिंदेंनी मोठा गळ टाकला; राजन तेलींचा शिवसेना प्रवेश

Shivkalin Wagh Nakh : कोल्हापुरात शिवकालीन वाघनखे दाखल, उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार का?

SCROLL FOR NEXT