ICICI Bank iMobile app glitch Several ICICI Bank customers are now seeing details of other users
ICICI Bank iMobile app glitch Several ICICI Bank customers are now seeing details of other users  Sakal
Personal Finance

ICICI Bank: ICICI बँकेच्या iMobile Pay ॲपमध्ये मोठा घोळ; ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती होतेय उघड

राहुल शेळके

ICICI Bank iMobile Glitch: ICICI बँकेच्या मोबाईल अॅप्लिकेशन iMobile Pay वर तांत्रिक समस्या आल्या आहेत. काही ग्राहकांनी दावा केला आहे की या प्लॅटफॉर्मवर इतरांची संवेदनशील क्रेडिट कार्डची माहिती दिसत आहे. ही समस्या लक्षात येताच, ICICI बँकेने कारवाई केली आणि सध्या iMobile ग्राहक ॲपवर त्यांचे क्रेडिट कार्ड तपशील पाहू शकत नाहीत.

टेक्नोफिनोचे संस्थापक सुमंता मंडल यांनी या घटनेची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली आहे. या पोस्टसह त्यांनी आयसीआयसीआय बँक आणि देशातील केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही टॅग केले आहे आणि त्यांना या प्रकरणात त्वरित लक्ष घालण्यास सांगितले आहे.

सुमंत मंडल यांनी लिहिले आहे की, अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की ते त्यांच्या iMobile ॲपवर इतर ग्राहकांचे ICICI बँक क्रेडिट कार्ड तपशील पाहू शकतात. यामध्ये क्रेडिट कार्डचा संपूर्ण क्रमांक, एक्सपायरी डेट आणि सीव्हीव्ही मोबाईलवर दिसत आहेत.

अगदी आंतरराष्ट्रीय व्यवहार सेटिंग्ज करण्याचा पर्याय देखील पाहिला जाऊ शकतो. त्यामुळे अशा वापरकर्त्यांच्या क्रेडिट कार्डवर आंतरराष्ट्रीय व्यवहार करणे कोणालाही शक्य होणार असून त्यामुळे मोठ्या आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

आयसीआयसीआय बँकेने उचलले पाऊल

जेव्हा अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर ही समस्या नोंदवली तेव्हा सुमंत मंडल यांनी पोस्ट केले की कदाचित ही समस्या सोडवण्यासाठी ICIC बँकेने क्रेडिट कार्डची माहिती iMobile ॲपवर दिसणे थांबवले आहे.

कार्ड ब्लॉक करण्याचा सल्ला दिला

सामान्य वापरकर्त्यांना या समस्येमुळे कोणतेही नुकसान होऊ नये याची खात्री करण्यासाठी, टेक्नोफिनोच्या संस्थापकांनी सल्ला दिला आहे की वापरकर्त्यांनी त्यांचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करावे.

आयसीआयसीआय बँकेचं स्पष्टीकरण

“आमचं ग्राहक हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्ही त्यांच्या हिताचं रक्षणासाठी मनापासून समर्पित भावनेनं काम करत आहोत. आमच्या लक्षात आलं आहे की, गेल्या काही दिवसांत इश्यू करण्यात आलेली सुमारे १७,००० नवीन क्रेडिट कार्ड आमच्या डिजिटल चॅनेलमध्ये चुकीच्या युजर्ससाठी चुकीच्या पद्धतीने मॅप केली गेली आहेत. ही बँकेच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओच्या सुमारे 0.1 टक्के आहेत.

या समस्येवर तात्काळ उपाय म्हणून, आम्ही ही कार्ड ब्लॉक केली आहेत आणि ग्राहकांना नवीन कार्ड वितरीत करत आहोत. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तसेच या कार्ड्सच्या संचातील कार्डचा गैरवापर झाल्याची एकही घटना आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. पण जर कोणाचं यामुळं आर्थिक नुकसान झालं असेल तर बँक त्यांना योग्य ती भरपाई देईल, असं आम्ही आश्वासन देतो”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT