Go First  Sakal
Personal Finance

Go First Airlines: गो फर्स्टच्या अडचणीत वाढ, 20 विमानांची नोंदणी रद्द करण्याची केली मागणी, कारण...

गो-फर्स्ट एअरलाइन्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

राहुल शेळके

Go First Airlines: गो-फर्स्ट एअरलाइन्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. कंपनीने स्वतः NCLT (National Company Law Tribunal) मध्ये स्वैच्छिक दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज देखील दिला आहे.

आज गो फर्स्टला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे आणि विमानाच्या तेलाची थकबाकी भरण्यासाठी कंपनीकडे पुरेसे पैसेही शिल्लक नाहीत. विमान कंपनीबद्दल असेही बोलले जात आहे की ती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे, कारण कंपनीचे पैसे आणि तेल दोन्ही संपणार असल्याचे सांगितले जात आहे.

GoFirst एअरलाइनला 20 विमाने भाडेतत्त्वावर देण्यात आली होती आणि आता या भाडेकरूंनी डीजीसीए (Directorate General of Civil Aviation) ला त्यांची नोंदणी रद्द करून ती परत करण्यास सांगितले आहे.

कायदा काय म्हणतो?

नियमांचा हवाला देत, या प्रकरणाशी संबंधित लोकांनी सांगितले होते की भाडेकरूने विनंती केल्यानंतर डीजीसीएने आपल्या वेबसाइटवर माहिती पोस्ट करावी आणि त्यानंतर पाच दिवसांत विमानाची नोंदणी रद्द करावी.

एअरलाइन्सने काय सांगितले?

अमेरिकन कंपनी प्रॅट अँड व्हिटनीकडून भाडेतत्त्वावर सुटे इंजिन घेऊन परिस्थिती सुधारताच ते त्यांची विमाने पुन्हा परत करतील असे एअरलाइन्सने म्हटले आहे. GoFirst ने असाही आरोप केला आहे की यूएस फर्मने इंजिनच्या पुरवठ्याबाबत आपला शब्द पाळला नाही, त्यामुळे कंपनीला अनेक संकटांचा सामना करावा लागला.

एअरलाइन्सच्या वकिलाने बाजू मांडली:

एनसीएलटीने सुमारे चार तास या प्रकरणावर सुनावणी घेतली, त्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, GoFirst च्या वकिलांनी सांगितले आहे की ऐच्छिक दिवाळखोरी आणि स्थगितीची विनंती कर्जदारांची थकबाकी टाळण्यासाठी नाही तर कंपनी वाचवण्यासाठी होती. एअरलाइनवर ₹ 11,463 कोटींचे कर्ज आहे आणि त्यांनी 9 मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत आणि 15 मे पर्यंत तिकीट विक्रीही थांबवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT