Income Tax Return Sakal
Personal Finance

Income Tax Return: सरकारचा मोठा निर्णय, ITR भरण्याची मुदत वाढवली, कोणाला होणार फायदा?

Income Tax Return: प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

राहुल शेळके

Income Tax Return: सरकारने आता कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. कंपन्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली आहे. आयकर रिटर्न भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवून 30 नोव्हेंबर केली आहे.

याशिवाय, ज्या कंपन्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख देखील एक महिन्याने वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे.

वित्त मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, फॉर्म ITR-7 मध्ये आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षात, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 23.51% ने वाढून 8.65 लाख कोटी रुपये झाले आहे. कंपन्यांनी अधिक आगाऊ कर भरल्यामुळे प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. या कालावधीत आगाऊ कर भरणा 21% वाढला आहे.

आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या 18.23 लाख कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या 47.45% निव्वळ कर संकलन झाले आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रत्यक्ष कर संकलन 16.61 लाख कोटी रुपये होते.

आयकर विभागाने रिटर्न सबमिट करताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक ई-फायलिंग डेस्कही स्थापन केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एकूण प्रत्यक्ष कर संकलन 18.29 टक्क्यांनी वाढून 9.87 लाख कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 8.34 लाख कोटी रुपये होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT