ITR File 2023 Sakal
Personal Finance

ITR File 2023: सल्लागार आणि फ्रीलान्सरही भरु शकतात ITR! कागदपत्रांची माहिती आणि संपूर्ण प्रोसेस एका क्लिकवर

तुम्ही फ्रीलान्सर किंवा सल्लागार म्हणून काम करत असल्यास तुमची रिटर्न भरण्याची पद्धत पगारदार व्यक्तीपेक्षा खूपच वेगळी असेल.

राहुल शेळके

ITR File 2023: प्रत्येक पात्र करदात्याने कर भरणे आवश्यक आहे. आता आर्थिक वर्ष 2022-23 साठी बहुतेक पगारदार कर्मचारी आयटीआर भरण्यास सुरूवात करतील. अनेक कर्मचाऱ्यांना यासाठी ITR-1 (सहज) भरावा लागतो.

म्हणजेच ज्यांचा पगार, एक घराची मालमत्ता आणि इतर स्रोत जसे की व्याज इत्यादींपासून 50 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते त्यांच्याकडून ITR-1 दाखल केला जातो.

तुम्ही फ्रीलान्सर किंवा सल्लागार म्हणून काम करत असल्यास तुमची रिटर्न भरण्याची पद्धत पगारदार व्यक्तीपेक्षा खूपच वेगळी असेल. विवरणपत्र भरताना कोणत्याही फ्रीलान्सर किंवा सल्लागाराला ITR-1 किंवा ITR-2 फॉर्म वापरण्याची आवश्यकता नाही.

यासह, तो 50,000 रुपयांच्या कपातीचा दावा करू शकत नाही. याचे कारण म्हणजे त्याच्याकडे पगाराचे कोणतेही उत्पन्न नाही. तर तो व्यवसायाचा खर्च म्हणून दावा करु शकतो.

सल्लागार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने टॅक्स रिटर्न भरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात.

कर स्लॅब

फ्रीलान्सर किंवा सल्लागार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आयकर स्लॅब आहेत. हा स्लॅब पगारदार व्यक्तींसारखाच आहे. तुम्ही तुमच्या उत्पन्नावर आधारित टॅक्स स्लॅब निवडावा. सल्लागाराला दरवर्षी कर स्लॅब निवडण्याची गरज नाही. पगारदार व्यक्तीला दरवर्षी कर स्लॅब निवडावा लागते.

आयकर कायदा कलम 44ADA

फ्रीलान्सर किंवा सल्लागार कलम 44ADA अंतर्गत कर आकारण्याची निवड करू शकतात. हा विभाग कायदेशीर, वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चरल व्यवसाय किंवा CBDT द्वारे अधिसूचित इतर कोणत्याही व्यवसायात असलेल्यांना लागू आहे.

रिटर्न भरण्यासाठी फ्रीलान्सरने फॉर्म-3 चा वापर करावा. सल्लागाराने अनुमानित कर आकारणीचा पर्याय निवडल्यास, त्याला फॉर्म-4 निवडावा लागेल.

हे फॉर्म-3 पेक्षा खूपच सोपे आहे. यामध्ये सल्लागाराला त्याच्या नफा-तोट्याची माहिती द्यावी लागते. जर फ्रीलान्सरचे उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर तो फॉर्म-4 भरू शकत नाही.

ITR कसा भरावा

  • तुम्हाला आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.

  • लॉग-इन केल्यानंतर, तुम्हाला रिटर्न फाइलचा पर्याय निवडावा लागेल.

  • आता आर्थिक वर्ष 2022-23 चा पर्याय निवडल्यानंतर ऑनलाइन पर्याय निवडा.

  • आता तुम्हाला New Filing वर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला Individual चा पर्याय निवडावा लागेल.

  • आता योग्य ITR फॉर्म निवडा.

  • आता तुम्ही फॉर्मवरील सूचना काळजीपूर्वक वाचा. आता फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती भरा.

  • यानंतर तुम्ही सर्व माहिती तपासा.

  • आता तुम्ही कर कपातीचा दावा करू शकता.

  • यानंतर तुम्हाला तुमच्या रिटर्नची पडताळणी करावी लागेल. तुम्ही तुमच्या रिटर्नची ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने पडताळणी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT