Nestle's Maggi Sale in India  Sakal
Personal Finance

Maggi Sales In India: भारतीयांना मॅगीचे वेड! कंपनीने 15 महिन्यांत केली 24,000 कोटींची कमाई

Nestle's Maggi Sale in India: नेस्लेच्या नूडल्स मॅगीसाठी भारत ही जागतिक स्तरावर सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे, तर चॉकलेट वेफर ब्रँड किटकॅटसाठी ही दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नेस्ले इंडियाच्या ताज्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

राहुल शेळके

Maggi Sales In India: नेस्लेच्या नूडल्स मॅगीसाठी भारत ही जागतिक स्तरावर सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे, तर चॉकलेट वेफर ब्रँड किटकॅटसाठी ही दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नेस्ले इंडियाच्या ताज्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय, भारतीय बाजारपेठ नेस्लेसाठी दुहेरी अंकी वाढीसह सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ बनली आहे. अहवालानुसार, कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षात मॅगीच्या सहा अब्जाहून अधिक सर्व्हिंग्सची विक्री केली, ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर मॅगीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ बनली.

भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ कशी बनली

नेस्ले इंडियाच्या 2023-24 च्या वार्षिक अहवालानुसार, कंपनीचा विस्तार आणि नावीन्य, उत्तम संसाधन वाटप या गोष्टी व्यवसायाला पुढे नेण्यात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. नेस्ले मॅगी ब्रँड अंतर्गत आपली विक्री वाढवत आहे आणि 10 रुपये किमतीत ओट्स नूडल्स, कोरियन नूडल्स आणि विविध मसालेदार मॅगी नूडल्स लाँच केले आहेत.

किटकॅटनेही केला चमत्कार

नेस्ले इंडियाने सांगितले की त्यांनी किटकॅटचे ​​4.20 कोटी 'फिंगर्स' विकले. नवीन उत्पादने, वितरण नेटवर्कचा विस्तार आणि नाविन्यपूर्ण ब्रँड्समुळे ही वाढ झाली आहे. नेस्ले इंडियाने 31 मार्च 2024 पर्यंत गेल्या 15 महिन्यांत 24,275.5 कोटी रुपयांच्या विक्रीचा टप्पा गाठला आहे.

बंदी नंतर मॅगीचा मार्केट शेअर घसरला

आज, कंपनीसाठी विक्रमी विक्री करणारी मॅगी 2015 साली एका मोठ्या वादात सापडली होती. आरोग्याच्या कारणास्तव, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने जून 2015 मध्ये मॅगी नूडल्सवर 5 महिन्यांसाठी बंदी घातली होती. या बंदीमुळे नेस्ले इंडियाला मोठा फटका बसला होता. बंदीच्या वेळी भारतीय नूडल्स मार्केटमध्ये मॅगीचा वाटा जवळपास 80 टक्के होता. बंदीनंतर महिन्याभरातच तो शून्यावर आला होता.

आता बंदीनंतर जवळपास दशकभरानंतर मॅगीला तिचा दर्जा मिळवून देण्यासाठी धडपड सुरू आहे. या विभागात अनेक कंपन्यांनी प्रवेश केल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. गेल्या 8 वर्षांत कंपनीने भारतात सुमारे 140 उत्पादने लॉन्च केली आहेत. याशिवाय 2025 पर्यंत भारतात 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT