RBI  Sakal
Personal Finance

Gold Reserve: भारत तिसऱ्या क्रमांकावर! गेल्या महिन्यात 722 कोटी रुपयांचे सोने केले खरेदी; पहिल्या क्रमांकावर कोण?

Gold Buying: गेल्या काही वर्षांत भारताच्या सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात सोन्याची वाढलेली खरेदी हे त्याचे प्रमुख कारण आहे. सोने खरेदीचा हा ट्रॅक रेकॉर्ड अजूनही चांगला असून मे महिन्यातही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाली आहे.

राहुल शेळके

India Gold Reserve: गेल्या काही वर्षांत भारताच्या सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात सोन्याची वाढलेली खरेदी हे त्याचे प्रमुख कारण आहे. सोने खरेदीचा हा ट्रॅक रेकॉर्ड अजूनही चांगला असून मे महिन्यातही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाली आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सोन्याचा खरेदीदार म्हणून उदयास आला. गेल्या महिन्यात भारताने 722 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले. प्रमाणानुसार ही खरेदी 45.9 टन इतकी आहे. सोन्याचा साठा वाढवण्यासाठी भारत अजूनही आक्रमक पवित्रा घेत असल्याचे यावरून दिसून येते.

भारतापेक्षा जास्त सोने खरेदी कोणत्या देशाने केली?

गेल्या महिन्यात सोने खरेदीच्या बाबतीत दोनच देश भारताच्या पुढे होते. 312.4 टन सोने खरेदी करून स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावर आहे. या खरेदीचे मूल्य 2,461 कोटी रुपये आहे. तर शेजारील देश चीन 2,109 कोटी रुपयांना 86.8 टन सोने खरेदी करून दुसऱ्या स्थानावर आहे.

पाच वर्षांत सोन्याचा साठा किती वाढला?

गेल्या काही वर्षांत भारताच्या सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च 2019 मध्ये भारताकडे 618.2 टन सोन्याचा साठा होता. मार्च 2014 पर्यंत हा साठा 822.1 टन इतका वाढला होता. म्हणजेच गेल्या 5 वर्षांत भारताच्या सोन्याच्या साठ्यात 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी काय कारण दिले होते?

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अलीकडेच सांगितले होते की, देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याला स्थिरता देण्यासाठी आणि पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी अधिक सोने खरेदी केले जात आहे. ते म्हणाले होते की, डॉलरच्या अस्थिरतेमुळे रिझर्व्ह बँकेला सोन्याचा साठा वाढवण्याची गरज भासू लागली.

प्राचीन काळापासून सोन्याला गुंतवणूकदारांची पसंती आहे. आजच्या काळात, अनिश्चित वातावरणात सोने सुरक्षित गुंतवणूक म्हणून मानले जाते. यामुळेच जगात जेव्हा जेव्हा भू-राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा सोन्याची मागणी वाढते आणि त्याची किंमत वाढू लागते. रिझर्व्ह बँकेसह इतर अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्याच्या सर्वात मोठ्या खरेदीदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT