Raghuram Rajan Sakal
Personal Finance

Raghuram Rajan: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास अर्थव्यवस्थेचं काय होणार? रघुराम राजन म्हणाले...

Raghuram Rajan: लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. मतदानाचा सातवा टप्पा 1 जून रोजी होईल आणि निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाईल. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे निवडणुकीत पराभव आणि विजयाबाबत स्वतःचे दावे आहेत.

राहुल शेळके

Raghuram Rajan: लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. मतदानाचा सातवा टप्पा 1 जून रोजी होईल आणि निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाईल. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे निवडणुकीत पराभव आणि विजयाबाबत स्वतःचे दावे आहेत. भाजपा 400 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करीत आहे. दरम्यान, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले किंवा नाही झाले तरी भारत त्याच्या आर्थिक धोरणाच्या मार्गावर पुढे जात राहील.

राजन यांनी ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, भारतीय धोरणात सातत्य आहे. कोणतेही सरकार आले तरी ते अनेक चांगल्या गोष्टी पुढे नेतात. नवीन सरकार लवकरच अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. यामध्ये अनेक चांगली कामे पुढे नेण्यात येणार असून त्यात आणखी काय बदल करता येतील हेही पाहिले जाणार आहे.

आरबीआयचे माजी गव्हर्नर म्हणाले की, देशात पायाभूत सुविधांची मोठी कमतरता लक्षात घेता मोदी सरकारच्या काळात त्यावर खर्च करणे आवश्यक होते. पण पुढे जाऊन भारताला आपल्या पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे लागेल आणि त्याचे फायदे मोठ्या कंपन्यांपर्यंत मर्यादित नसतील याची काळजी घ्यावी लागेल.

या निवडणुकीत भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल अशी अपेक्षा आहे. भाजपने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केल्यास आर्थिक आघाडीवर अनेक मोठ्या सुधारणा पुढे नेल्या जाऊ शकतात, असे मानले जात आहे. दुसरीकडे, भाजप सरकार स्थापन करण्यात अपयशी झाल्यास शेअर बाजारात मोठी विक्री दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT