Indian real estate market face a crisis like China know details  Sakal
Personal Finance

Real Estate: चीन बुडतंय ? भारतातील रियल इस्टेट क्षेत्राने धडा शिकणे गरजेचे, काय घडतंय नेमकं

Indian Real Estate Sector: चीनच्या विकासात रिअल इस्टेट उद्योगाचा मोठा वाटा आहे. रिअल इस्टेट उद्योग हा अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी इंजिन समजले जाते. चीनच्या जीडीपीमध्ये या उद्योगाचा वाटा 30 टक्के आहे. पण चीनमधील रिअल इस्टेट कंपन्या एकामागून एक दिवाळखोरीत जात आहेत.

राहुल शेळके

Indian Real Estate Sector: चीनच्या विकासात रिअल इस्टेट उद्योगाचा मोठा वाटा आहे. रिअल इस्टेट उद्योग हा अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी इंजिन समजले जाते. चीनच्या जीडीपीमध्ये या उद्योगाचा वाटा 30 टक्के आहे. पण चीनमधील रिअल इस्टेट कंपन्या एकामागून एक दिवाळखोरीत जात आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबत चीन सरकारही चिंतेत आहे. चीनमधील रिअल इस्टेट उद्योग अडचणीत का आहे? त्याची कारणे काय आहेत? भारतात काय परिस्थिती आहे? जाणून घेऊया

चीनच्या दोन मोठ्या रिअल इस्टेट कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. यापैकी एक म्हणजे एव्हरग्रेंड, जी 2021मध्येच दिवाळखोर झाली. चीनमधील एव्हरग्रेंडनंतर आणखी एक कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. तीचे नाव कंट्री गार्डन आहे. एकेकाळी, कंट्री गार्डन ही कमाईच्या बाबतीत चीनमधील सर्वात मोठी कंपनी होती.

मात्र, ही कंपनीही आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. चीनचे रिअल इस्टेट क्षेत्र गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आहे. लोक नवीन घरे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे किंमती घसरत आहेत, तसेच बेरोजगारीही वाढत आहे. वाढलेले व्याजदर, कर्ज घेण्यासाठी कडक नियम आणि चीनमधील मंदी यासह अनेक कारणांमुळे रिअल-इस्टेट क्षेत्र 2021 पासून थंड पडले आहे.

चीनमधील अनेक प्रॉपर्टी डेव्हलपर्सनी कंपनीचा विस्तार करण्यासाठी कर्ज घेतले आहे. मात्र सध्या बाजारात मागणी नसल्याने त्यांना उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे रिअल इस्टेट कंपन्या कर्जाच्या विळख्यात सापडल्या आहेत. चीन सरकार रिअल-इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्ज घेणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करत आहे.

यामुळे कंपन्यांना कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून कर्ज घेणे कठीण झाले आहे, जे त्यांच्या दिवाळखोरीचे कारण बनत आहे. चिनमधील रिअल इस्टेट कंपन्यांच्या दिवाळखोरीमुळे अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. स्टॉकच्या किंमती घसरल्या आहेत. याशिवाय आर्थिक विकासही मंदावला आहे.

चीन आणि भारत यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे लोकांकडून असणारी घरांची मागणी. 2008 च्या आर्थिक मंदीच्या काळातही भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात स्थिर मागणी होती. आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार 2023 मध्ये भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी आहे आणि घरांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 26 टक्के वाढ होत आहे.

पुणे, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत घरांची विक्री वाढली आहे. नाईट फ्रँकच्या अहवालात भारतात येत्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी कायम राहणार असल्याचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT