Indian Stock Market  sakal
Personal Finance

Indian Stock Market : व्यवसायचक्राचे महत्त्व

भारतीय शेअर बाजारात सातत्याने तेजी दिसून येत आहे. देशाची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील संधी खुल्या होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

संतोष परदेशी

संस्थापक, मनीलान्सर इन्व्हेस्टमेंट प्रा.लि.

भारतीय शेअर बाजारात सातत्याने तेजी दिसून येत आहे. देशाची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील संधी खुल्या होत आहेत. गेल्या दोन दशकांत भारताने आर्थिक शक्यतांना आकार देणाऱ्या मॅक्रो इव्हेंट्समध्ये (व्यापक घडामोडी) अनेक बदल पाहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत आघाडीवर असणारी क्षेत्रे आणि शेअरमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत.

यापूर्वी असे बदल हे २००३-०४ या काळात दिसून आले होते. दुसरे वळण (टर्निंग पॉइंट) २०११ ते २०१३ या काळात आले आणि त्यानंतर २०१८ मध्ये नोटाबंदीची घोषणा झाली. या प्रत्येक टप्प्यावर काही विशिष्ट क्षेत्रे चर्चेत आली. अशी वळणे कधी येतील आणि त्यानुसार होणारे बदल ओळखून गुंतवणूक करणे कठीण असते. अशा वेळी व्यवसायचक्र अर्थात बिझनेस सायकल आधारित गुंतवणूक कामाला येते.

व्यवसायचक्राची वैशिष्ट्ये

व्यवसायचक्र अर्थात बिझनेस सायकलवर आधारित गुंतवणूक ही सर्वसामान्यपणे व्यापकतेवर (मॅक्रोवर) आधारित केली जाते. तिची चार वैशिष्ट्ये आहेत; बदलत्या संकल्पना ओळखण्याचा टॉप-डाउन दृष्टीकोन, जगभरातील संधींचा लाभ घेण्याच्या दृष्टीने मार्केट कॅप अॅग्नोईस्ट असणे, दृढनिश्चय असलेल्या निवडक विषयांवर जास्त भर देणे आणि क्षमतेची खात्री असलेल्या संकल्पना आणि क्षेत्रांवर भर देणे. अशा गुंतवणुकीसाठी क्षेत्र व व्यवसायात होणारे बदल ओळखण्यासाठी दूरदृष्टिता, जलद निर्णयक्षमता यांची आवश्यकता असते, कारण बाजारपेठेत वेगाने बदल होऊ शकतात. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणेही आवश्यक असते, कारण निर्णयांचा परिणाम दिसायला थोडा वेळ लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Latest Marathi News Updates : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्प'; महाराष्ट्रातील अभियांत्रिकी चमत्कार - फडणवीस

SCROLL FOR NEXT