Wholesale Inflation Data Sakal
Personal Finance

WPI Inflation: सर्वसामान्यांना मोठा धक्का! घाऊक महागाई दर 16 महिन्यांच्या उच्चांकावर, काय आहे कारण?

WPI Inflation Data: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. जून महिन्यातील घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर झाली आहे. जून महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीमुळे घाऊक महागाईचा दर 16 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

राहुल शेळके

WPI Inflation Data: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. जून महिन्यातील घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर झाली आहे. जून महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीमुळे घाऊक महागाईचा दर 16 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. घाऊक महागाईचा दर गेल्या महिन्यात 3 टक्क्यांच्या पुढे गेला असून तो 3.36 टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी मे महिन्यात हा दर 2.61 टक्के होता.

अन्नधान्याच्या महागाई दरात वाढ

प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या असून त्याचा परिणाम घाऊक महागाई दरावर झाला आहे. अन्नधान्याचा महागाई दर जूनमध्ये 8.68 टक्के झाला आहे, जो मेमध्ये 7.40 टक्के होता.

महागाई वाढण्याचे कारण काय?

जूनमध्ये महागाई दर वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे अन्नधान्य महागाई दर आणि प्राथमिक वस्तूंच्या महागाई दरात झालेली वाढ. उत्पादित उत्पादनांचा महागाई दर एक टक्क्यांपेक्षा कमी होता, तो यावेळी जवळपास दीड टक्क्यांवर पोहोचला असून, त्याचा परिणाम घाऊक महागाई दरावर झाला आहे. अन्नधान्य महागाई वाढीचा दर जूनमध्ये 8.68 टक्के झाला आहे, जो मेमध्ये 7.40 टक्के होता.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जून महिन्यासाठी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यात महागड्या भाज्यांमुळे घाऊक महागाईचा दर वाढला आहे.

मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, जून 2024 मध्ये महागाई दर सकारात्मक राहिला. महागाई दर वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या किमती. उत्पादित अन्नपदार्थ, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल आणि अनेक उत्पादित उत्पादनांच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा दर वाढला आहे.

'या' वस्तूंच्या किमती वाढल्या

  • जून महिन्यात भाज्यांच्या महागाईचा दर 38.76 टक्के होता, तो मे महिन्यात 32.42 टक्के होता.

  • तर जूनमध्ये कांद्याचा भाव 93.35 टक्के होता.

  • बटाट्याचा भाव 66.37 टक्के होता.

  • जूनमध्ये डाळींच्या महागाईचा दर 21.64 टक्क्यांनी वाढला आहे.

  • इंधन आणि वीज महागाई दर 1.03 टक्के राहिला, जो मे महिन्याच्या 1.35 टक्क्यांपेक्षा किरकोळ कमी आहे.

  • जूनमध्ये उत्पादित उत्पादनांची महागाई 1.43 टक्के होती, जी मे महिन्यात 0.78 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

घाऊक महागाई वाढीचा दर किरकोळ महागाई दराच्या आकडेवारीशी सुसंगत आहे. 12 जुलै 2024 रोजी किरकोळ महागाई दर जाहीर करण्यात आली. जूनमध्ये किरकोळ महागाई वाढ 5.1 टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चलनविषयक धोरण तयार करताना प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा दर विचारात घेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT