Infosys Devidend Sakal
Personal Finance

Infosys Devidend: सासरेबुवांच्या कंपनीचा लाभांश जाहीर; जावई-मुलीच्या संपत्तीत तब्बल 138 कोटींची वाढ

Infosys Devidend: इन्फोसिस कंपनीचा निव्वळ नफा 3.2 टक्क्यांनी वाढून 6,212 कोटी रुपये झाला आहे.

राहुल शेळके

Infosys Devidend: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने आपल्या भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. कंपनी FY24 साठी प्रति इक्विटी शेअर 18 रुपये लाभांश जारी करणार आहे. यासाठी 25 ऑक्टोबर 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. तर, पेमेंटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे.

सप्टेंबरच्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा 3.2 टक्क्यांनी वाढून 6,212 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या लाभांशाच्या घोषणेनंतर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत 2023 मध्ये सुमारे 138 कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या इन्फोसिसमधील मोठ्या भागीदार आहेत. ऋषी सुनक यांच्याकडे इन्फोसिसचे 3,89,57,096 शेअर्स आहेत. हा कंपनीचा 1.05 टक्के हिस्सा आहे. अशा परिस्थितीत 18 रुपये प्रति शेअर लाभांशावर त्यांची संपत्ती 70 कोटी रुपयांनी वाढली आहे.

2023 च्या पहिल्या तिमाहीत जाहीर झालेल्या निकालांमध्ये प्रति शेअर 17.50 रुपये लाभांश जारी करण्यात आला होता. 2 जून 2023 रोजी 17.50 रुपयांचा लाभांश जारी केल्यानंतर अक्षता मूर्तीच्या संपत्तीत 68 कोटींची वाढ झाली होती.

आता प्रति शेअर 18 रुपये लाभांश जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, अक्षता मूर्तीच्या संपत्तीत 70 कोटी रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे, म्हणजेच 2023 मध्ये ती 138 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. शेअरधारकांना माहिती देताना इन्फोसिसने सांगितले की, लाभांश 6 नोव्हेंबर रोजी दिला जाईल.

अक्षता मूर्ती ही नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी आहे, त्यांचे लग्न ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झाले आहे. इन्फोसिसमध्ये मोठी भागीदारी असल्यामुळे, कंपनी जेव्हा लाभांश जारी करते तेव्हा त्यांच्या संपत्तीत वाढ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Defence Minister: ''आमचे पूर्वज हिंदूच, पाकिस्तानमध्ये चुकीचा इतिहास शिकवला जातोय'' पाकच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

SRH vs RR: प्लॅन A, B किंवा C... वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी पॅट कमिन्स सज्ज; एलिमिनेटर आधी काय म्हणाला, वाचा

Women Reservation: मोठी बातमी! सर्व आगामी निवडणुकांमध्ये महिला आरक्षण लागू; ३३ टक्के जागा राखीव ठेवणार, कुणी घेतला निर्णय?

Ebola Virus: आफ्रिकेनंतर भारतातही इबोलाची धास्ती! काय आहे हा जीवघेणा व्हायरस, कोणती आहेत लक्षणं? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : CBSE च्या दोन भाषांच्या धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा स्थगितीला नकार, पुढची सुनावणी जुलैमध्ये

SCROLL FOR NEXT