Infosys to make 3-day work from office mandatory amid Narayana Murthy’s focus on productivity  Sakal
Personal Finance

Infosys: इन्फोसिस कंपनीचा मोठा निर्णय! वर्क फ्रॉम होम होणार बंद; ऑफिसमध्ये न आल्यास...

Infosys Work From Office: नवीन नियम लवकरच लागू केला जाईल

राहुल शेळके

Infosys Work From Office: भारतातील सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करण्यास सांगितले आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी उत्पादकता आणि आर्थिक वाढीसाठी कर्मचार्‍यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याची गरज वारंवार नमूद केल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन नियम लवकरच लागू केला जाईल

अहवालानुसार, सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान 3 दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे. या अगोदर कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितले होते. परंतु याला कर्मचाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे इन्फोसिसने म्हटले आहे की, कोविड -19 च्या आजारानंतर तीन वर्षे घरातून काम काम करणे पुरेसे होते.

विप्रोनेही कर्मचाऱ्यांना दिला इशारा

यापूर्वी विप्रोनेही आपल्या कर्मचाऱ्यांना तीन दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितले होते आणि तसे न केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला होता.

विप्रोनेही आठवड्यातून तीन दिवस ऑफिसमध्ये येणे बंधनकारक केले आहे. अहवालानुसार विप्रोने 7 जानेवारीपासून कारवाईचा इशारा दिला आहे.

भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने देखील कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमधून काम करण्यास सांगितले आहे.

मुख्य वित्त अधिकारी निलांजन रॉय यांनी राजीनामा दिला

इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजन रॉय यांनी राजीनामा दिला आहे. त्याच वेळी आयटी सेवा प्रमुख इन्फोसिसने जयेश संघराजका यांची नवीन सीएफओ म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. निलांजन रॉय 31 मार्च 2024 पर्यंत कंपनी सोडतील.

त्यांच्या जाण्यानंतर, जयेश संघराजका 1 एप्रिल 2024 पासून या पदाची सूत्रे स्वीकारतील. इन्फोसिसने एका निवेदनात म्हटले आहे की, 2018 मध्ये या पदावर नियुक्त झालेल्या रॉय यांनी इन्फोसिसच्या बाहेर वैयक्तिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT