Investment Tip For Women esakal
Personal Finance

Investment Tip For Women : महिलांनो, आर्थिक नियोजन करताना 'या' 7 चुका टाळा, नाहीतर...

Smart Financial Planning Tips : गुंतवणुक करणे फार गरजेचे असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी.

धनश्री भावसार-बगाडे

Women Should Avoid These 7 Mistakes In Money Savings :

सध्याच्या आधुनिक जगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने, किंबहुना पुरुषांच्याही पुढे जाऊन काम करत आहेत. शिक्षण असो, संशोधन असो किंवा अगदी आपल्या कुटुंबाची गरज भागविण्यासाठी नोकरी करणं असो, स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात आता नवीन राहिलेल्या नाहीत.

परंतु आपलं भवितव्य घडवत असताना, सातत्याने काम करत असताना त्या स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याचा फार विचार करत नाहीत हे सगळीकडे दिसून येतं. पैसे कमावणे महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर त्या पैशांचं नियोजन करणं, आणि त्यातून आर्थिक स्वयंपूर्णतेकडे जाणंही तितकंच महत्वाचं आहे.

काही बाबी टाळल्या तर स्त्रियांना आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणं आणखी सोपं होईल. याविषयी फायनान्शियल मेंटोर किरांग गांधी यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यांना आर्थिक क्षेत्राचा २५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे.

महिलांनी या चुका टाळाव्या

१. पैशांबाबत चर्चा चालू असताना त्यात भाग न घेणं

भारतीय कुटुंबव्यवस्थेतलं स्त्रियांचं पूर्वीपासून असलेलं स्थान लक्षात घेता, घरात पैशांबाबत किंवा खर्चाबाबत चर्चा चालू असताना स्त्रिया स्वतःहून त्या चर्चेत भाग घेत नाहीत. पंरतु आपल्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना स्त्रियांनी त्यात ठरवून भाग घेतला पाहिजे. घरातील पुरुषांनीही त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यातून स्त्रियांना आर्थिक नियोजनाची सवय लागते.

२. निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करणं

  • स्त्रियांच्या अनेक चुकांपैकी एक सर्रास घडणारी चूक म्हणजे स्वतःच्या निवृत्तीला आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाला त्या आवश्यक तेवढं महत्व देत नाहीत. सामान्यतः घरातील स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त दिवस जगते, त्यामुळे तिच्या निवृत्तीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं.

  • निवृत्तीसाठी आर्थिक बचत करताना चलनवाढ, महागाई यांच्यासारखे अपरिहार्य घटक दुर्लक्षित राहिले तर वृद्धकाळात आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या निवृत्तीसाठी बचत खाते सुरू करून त्यात सातत्याने काहीतरी पैसे टाकत राहणं त्यांच्या आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

  • ही चूक आणि त्यातून पुढे येऊ घातलेली संकटे टाळायची असतील तर निवृत्तीच्या दृष्टीने आर्थिक बचत करणं त्वरित सुरू करायला हवं. इक्विटी म्युच्युअल फंड, इक्विटी, गोल्ड बॉण्ड, डेब्ट बॉण्ड, पीपीएफ, एनपीएस असे अनेक पर्याय आज बचतीसाठी उपलब्ध आहेत.

  • त्यापैकी योग्य पर्याय निवडून त्यात गुंतवणूक करायला सुरूवात करावी. जसजशी पगारात वाढ होत जाईल त्याप्रमाणे बचतीची रक्कमही वाढवत न्यावी. कंपाउंड इंटरेस्टचा विचार केला तर गुंतवलेली अगदी छोटी रक्कमही दीर्घकाळात चांगला परतावा मिळवून देऊ शकते.

३. इतरांचे पाहून केलेला अति खर्च

  • सध्याचं जग हे सोशल मीडियाने व्यापून टाकलं आहे. असंख्य जाहिराती, भरमसाट खर्च आणि एखादं उत्पादन विकत घेतल्यानंतर ते मिरवण्याची हौस आता सार्वत्रिक झाली आहे.

  • उत्पादने विकत घेतल्यानंतर ते जगाला दाखवण्याची हौस असलेल्या आपल्या सभोवतालच्या लोकांकडे पाहून आपल्यालाही अनेकदा तीच गोष्ट विकत घेण्याचा मोह होतो.

  • या मोहातून स्त्रिया खरेदीवर अति खर्च करतात आणि आर्थिक ताण ओढवून घेतात. हे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टीची आपल्याला गरज आहे, आणि कोणती गोष्ट आपण केवळ इच्छा म्हणून विकत घेतोय असा भेद करायला हवा.

  • तुमचे आर्थिक उद्दिष्ट्य ठरवा आणि त्यानुसार खर्चाचे, गुंतवणुकीचे नियोजन करा.

  • समाजाकडून मिळालेल्या कौतुकापेक्षा आर्थिक स्वयंपूर्णता आपल्याला जास्त समाधान देते हे लक्षात ठेवा.

४. आर्थिक संकटांचं नियोजन न करणं

  • भविष्यात येऊ घातलेल्या आर्थिक संकटांना, अचानक समोर येणाऱ्या खर्चांना तोंड देण्यासाठीही आर्थिक तजवीज प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी करायलाच हवी.

  • यात योग्य रकमेचा हेल्थ इन्शुरन्स, क्रिटिकल इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि इतर अनेक बाबींचा समावेश होतो.

  • संकटांसाठीचं आर्थिक नियोजन चांगलं असेल तर प्रत्यक्ष संकटाच्या वेळी आपल्यावर आर्थिक ताण येत नाही.

५. इमर्जन्सी फंड न उभारणे

  • आपलं आयुष्य अनिश्चितता आणि अनपेक्षित संकटांनी भरलेलं आहे. मोठा खर्च अनपेक्षितपणे समोर आल्यास आपलं आर्थिक नियोजन कोलमडून पडतं.

  • इमर्जन्सी फंड असल्यास अशा संकटांना आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो. परंतु विशेषतः स्त्रिया असा इमर्जन्सी फंड उभा करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यातून संकटाच्या वेळी त्यांच्यावर कर्ज किंवा उधारी घेण्याची वेळ येते.

  • इमर्जन्सी फंडसाठी वेगळे खाते उघडून त्यात सातत्याने रक्कम टाकण्यास लवकरात लवकर सुरुवात करा. तीन ते सहा महिने काहीही पैसे कमावले नाही तरी तुम्ही त्या पैशांच्या आधारावर जगू शकता, इतके पैसे त्या खात्यात हवेत हे ध्येय ठेवा. नोकरी जाणे, अचानक आलेलं आजारपण अशा अनपेक्षित संकटांच्या वेळी हे पैसे तुमचा आधार ठरतील.

६. आर्थिक शिक्षणाला महत्व न देणं

  • आर्थिक बाबींचे योग्य शिक्षण नसल्यास नियोजन करताना, निर्णय घेताना अनेक अडचणी येतात. अनेक संधी हातातून निसटतात. स्त्रिया अनेकदा वेळेअभावी किंवा इतरही अनेक कारणांनी असं शिक्षण घेण्याचं टाळतात. परंतु योग्य आर्थिक शिक्षण घेतल्यास दीर्घकालीन वाटचालीत खूप मोठा फायदा होतो हे सिद्ध झालं आहे.

  • अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक नियोजन करण्याची आणि निर्णय घेण्याची जबाबदारी परंपरेने पुरुषांकडे आलेली असते. स्त्रियांनी कटाक्षाने ही बाब टाळून आर्थिक नियोजनात सक्रियपणे भाग घेतला पाहिजे. बचत, गुंतवणूक इत्यादी गोष्टींची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. आर्थिक बाबी समजून घेतल्यास स्त्रियांना अधिकाधिक समृद्ध जीवन जगणं शक्य होईल.

७. रिस्क टाळण्यासाठी गुंतवणुकीपासूनच लांब राहणं

  • गुंतवणुकीच्या प्रत्येक प्रकारात कमीअधिक प्रमाणात रिस्क असतेच. ही रिस्क टाळण्यासाठी अनेक स्त्रिया गुंतवणुकीच्या वाटेलाच न जाण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय तुम्हाला सहज शक्य असलेल्या आर्थिक समृध्दीपासून दूर घेऊन जातो. त्यामुळे रिस्क फॅक्टर समजून घेणं आणि त्यानुसार गुंतवणूक करणं आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.

  • आर्थिक नियोजनाचं ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास असणं, आणि त्या आधारावर आपलं जगणं समृद्ध करणारे आर्थिक निर्णय घेता येणं म्हणजेच आर्थिक स्वयंपूर्णता! जेव्हा एखादी स्त्री अशा पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वयंपूर्ण होते तेव्हाच ती स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आर्थिक भवितव्य घडवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT