Indo Count Industries Ltd Sakal
Personal Finance

Indo Count Industries Ltd : केवळ 11 वर्षात गुंतवणूकदार कोट्यधीश, कोणता आहे हा शेअर ?

बेडशीट आणि रजाई बनवणारी कंपनी इंडो काउंट इंडस्ट्रीजच्या (Indo Count Industries) शेअर्समध्ये सध्या जोरदार वाढ होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Indo Count Industries Ltd : बेडशीट आणि रजाई बनवणारी कंपनी इंडो काउंट इंडस्ट्रीजच्या (Indo Count Industries) शेअर्समध्ये सध्या जोरदार वाढ होत आहे. लाँग टर्मचा विचार केल्यास केवळ 11 वर्षात 1 लाखापेक्षा कमी गुंतवणुकीसह या स्टॉकने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या शेअरने कमी कालावधीतही दमदार परतावा दिला आहे.

मागच्या 11 महिन्यांत तर गुंतवणूकदारांच्या पैशात तिप्पट वाढ झाली आहे. ब्रोकरेज फर्म या शेअरबाबत अजुनही याबाबत सकारात्मक आहेत आणि त्यांनी केवळ बाय रेटिंग आणि टारगेटही वाढवले आहे. त्याचे शेअर्स बीएसईवर सध्या 319 रुपयांवर ट्रेड करत आहेत. इंट्रा-डेमध्ये त्याने 323.70 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

इंडो काउंटचे शेअर्स 8 मार्च 2013 रोजी फक्त 2.64 रुपयांवर होते. आता तो 319 रुपयांवर आहे, म्हणजे अवघ्या 11 वर्षांत 83 हजारांच्या गुंतवणूकीवर त्यांचे गुंतवणूकदार कोट्यधीश झाले.

28 मार्च 2023 रोजी हे शेअर्स 101.15 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. या पातळीपासून, तो 11 महिन्यांत 260 टक्क्यांहून अधिक वाढला आणि 26 फेब्रुवारी 2024 रोजी गेल्या महिन्यात 364.60 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. त्यानंतर, शेअर्सची ही वाढ इथेच थांबली आणि सध्या हा शेअर त्याच्या उच्चांकापासून सुमारे 13 टक्के घसरणीवर आहे. मात्र, ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार हा शेअर त्याचा विक्रमी उच्चांक मोडून नवा उच्चांक गाठू शकतो.

इंडो काउंट ही देशातील सर्वात मोठी बेडशीट निर्यात करणारी आहे आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये वॉलमार्ट, जेसीपीनी आणि बेड बाथ अँड बियॉन्ड सारख्या कंपन्या आहेत. विस्तार आणि अधिग्रहणाद्वारे कंपनीची क्षमता आता 153 दशलक्ष मीटरपर्यंत पोहोचली आहे.

त्याचा 95 टक्के महसूल निर्यातीतून येतो, त्यापैकी 74 टक्के अमेरिकन बाजारातून येतो. मजबूत ग्राहक आधार, उत्पादन बकेटचा विस्तार, नवीन परदेशातील बाजारपेठांमध्ये प्रवेश, प्रीमियम उत्पादनांवर वाढता फोकस आणि आर्थिक वर्ष 2024 च्या अखेरीस 1,000 कोटीच्या कम्यूलेटिव कॅपेक्सच्या पार्श्वभूमीवर, कंपनीने पुढील तीन ते चार वर्षात मार्जिन विस्तारासोबत महसूल दुप्पट करण्याचे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यूएस मार्केटमध्ये कंपनीची हिस्सेदारी वाढत आहे, यूके आणि ईयूसह एफटीए (फ्री ट्रेड एग्रीमेंट) होण्याची शक्यता आहे. कंपनीकडे वाढीव मागणी पूर्ण करण्याची क्षमता आहे, ऑपरेटिंग लीव्हरेजद्वारे मार्जिन वाढू शकते; या सर्व कारणांमुळे, ब्रोकरेज नुवामाने आपले बाय रेटिंग कायम ठेवले आहे. तर टारगेट 430 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

SCROLL FOR NEXT