Gold Investment sakal
Personal Finance

Gold Investment : गुंतवणूकदारांनी खरेदी केले २७ हजार कोटींचे सुवर्णरोखे

देशातील गुंतवणूकदारांची सार्वभौम सुवर्णरोख्यांना चांगली पसंती मिळत असून, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २७,०३१ कोटी रुपये किमतीच्या सुवर्णरोख्यांची खरेदी झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशातील गुंतवणूकदारांची सार्वभौम सुवर्णरोख्यांना चांगली पसंती मिळत असून, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २७,०३१ कोटी रुपये किमतीच्या सुवर्णरोख्यांची खरेदी झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ही रक्कम आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये गुंतवलेल्या रकमेच्या चौपट आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये गुंतवणूकदारांनी रोख्यांच्या माध्यमातून तब्बल ४४.३४ टन सोने खरेदी केले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १२.२६ टन सोने ६५५१ कोटी रुपयांच्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आले होते.

मार्च २०२४ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात, चार टप्प्यांमध्ये हे रोखे जारी करण्यात आले. नोव्हेंबर २०१५ मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत एकूण ७२,२७४ कोटी रुपये ६७ टप्प्यांद्वारे उभारण्यात आले आहेत.

एका वर्षात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे सुमारे ६२,३०० रुपयांवरून ७३,२०० रुपयांवर गेला आहे. हे रोखे भांडवली नफाकरातून मुक्त असून, यात प्रारंभिक गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक २.५० टक्के दराने व्याज मिळते. हे रोखे एक ग्रॅम सोन्याच्या मूल्यांमध्ये आणि त्याच्या पटीत जारी केले जातात. प्रत्येक व्यक्तींसाठी कमाल चार किलो सोने घेऊ शकते, तर किमान एक ग्रॅम गुंतवणूक आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT