IPL 2024
IPL 2024 Sakal
Personal Finance

IPL 2024: आयपीएलच्या जाहिरातीचं असं आहे 'गणित'; 10 सेकंदासाठी मोजावे लागतात तब्बल 12.5 लाख रुपये

राहुल शेळके

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024चा 17वा हंगाम 22 मार्च 2024 पासून सुरू झाला आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले आहेत. आयपीएलमध्ये क्रिकेट प्रेमी मोठ्या खेळाडूंना मैदानावर एकत्र पाहण्याची वाट पाहत असतात तर दुसरीकडे या संघांचे मालक यातून मोठे उत्पन्न कमावण्याचा प्रयत्न करत असतात. मोठे उद्योगपती इंडियन प्रीमियर लीगमध्ये संघ खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. त्यात आयपीएल संघ पूर्ण स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमावतात.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) हे केवळ क्रिकेटपटूंसाठीच नाही तर जाहिरातदार आणि ब्रँडसाठीही मोठे प्लॅटफॉर्म आहे. चालू हंगामातील पहिल्या 23 सामन्यांमध्ये 86 नवीन ब्रँड्स जाहिरातीच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. अहवालानुसार, ग्राहकांना जाहिरात केल्या जाणाऱ्या टॉप 3-4 ब्रँडच्या पलीकडे बहुतेक ब्रँड आठवत नाहीत.

यंदा जाहिरात करणारे ब्रँड कोणते?

या हंगामात सर्वात मोठी जाहिरात गेमिंगची आहे. फूड आणि कोल्ड्रिंग कंपन्या या वर्षीही जाहिरातीच्या स्पर्धेत आहेत आणि विशेष म्हणजे, पान मसाला जाहिराती मोठ्या प्रमाणावर आहेत. ड्रीम11 ही सर्वात लोकप्रिय जाहिरातदार आहे. (What are the advertising brands?)

तर इतर ब्रँडमध्ये एशियन पेंट्स, विमल, थम्स अप चार्ज्ड, हॅवेल्स, जॉय कॉस्मेटिक्स, डेटॉल, हार्पिक, व्हेनेसा, अमूल, ग्रोव, रुपे आणि HDFC PayZapp आहेत. TAM मीडिया रिसर्चनुसार, पार्लेची बिस्किटे आणि एअरटेलचे एक्सस्ट्रीम फायबर हे या वर्षातील टॉप नवीन ब्रँड आहेत, परंतु गेमिंग आणि वॉलेट कंपन्यांनी सर्वाधिक लक्ष वेधले आहे.

टीव्ही आणि मोबाईलवरील स्ट्रिमिंगसाठीचे दर वेगळे असतात का?

टीव्ही आणि मोबाईलवरील स्ट्रिमिंगसाठीचे दर वेगळे असतात. मॅचमध्ये एक ओव्हर संपल्यावर एक छोटा ब्रेक होतो आणि त्या छोट्या ब्रेकमध्ये टीव्हीवर जाहिराती दाखवल्या जातात. अहवालानुसार, सामन्याच्या मध्यभागी 10 सेकंदाच्या जाहिरात स्लॉटची किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे. स्टार स्पोर्ट्सवरील जाहिरातदारांसाठी एसडी मधील 10-सेकंद स्लॉटसाठी 12.5 लाख आणि HD (हाय डेफिनिशन) साठी 5.3 लाख खर्च येतो. Jio Cinema च्या प्लॅटफॉर्मवर, मॅचच्या आधी आणि नंतर प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातींसाठी किमत 6.5 लाख आहे. ( Advertising Rates for streaming on TV and mobile )

आयपीएलचे 2022 आणि 2023 मधील कमाई किती होती?

IPL 2023 मध्ये 92,500 कोटींची कमाई झाली होती तर 2022 मध्ये 87,000 कोटींच्या तुलनेत हे प्रमाण 6.3 टक्क्यांनी वाढले आहे. (IPL earnings in 2022 and 2023)

प्रत्येक आयपीएल संघाची कमाई किती?

आयपीएल संघांच्या कमाईबद्दल बिझनेस लाइनने डी अँड पी ॲडव्हायझरीचे व्यवस्थापकीय भागीदार संतोष एन यांची मुलाखत प्रकाशित केली होती. त्यानुसार प्रत्येक संघाला सुमारे 450 ते 500 कोटी रुपये मिळतात. (IPL Team Earnings)

आयपीएलमध्ये कमाईचे साधन काय आहे?

आयपीएलमध्ये फ्रँचायझी आणि लीगकडे कमाईचे अनेक स्रोत आहेत. यातील एक मोठा भाग मीडिया प्रसारण अधिकारांचा आहे. आयपीएलने मीडिया राइट्समधून मोठी कमाई केली होती. हे हक्क 5 वर्षांपासून विकले गेले आहेत.

आयपीएलला प्रायोजकत्वातूनही चांगली कमाई होते. प्रत्येक संघाच्या जर्सीवर प्रायोजकांचे लोगो छापलेले असतात. यासोबतच सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये अनेक ठिकाणी जाहिराती लावण्यात येतात यातूनही मोठी कमाई होते. (Means of earning in IPL)

खेळाडूंवर किती खर्च होतो?

लिलावासाठी प्रत्येक संघाकडे 100 कोटी रुपये असतात. यामध्ये संघाला खेळाडू खरेदी करावे लागतात. या खर्चाबरोबरच हॉटेल, खाद्यपदार्थ आणि सामानावरही खर्च होतो. मात्र हा सर्व खर्च उत्पन्नापेक्षा खूपच कमी आहे.

डिजिटलवर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे का?

आयपीएलच्या 17 व्या हंगामात 29 सामने खेळले गेले आहेत, या दरम्यान चाहत्यांना अनेक हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळाले आणि सामन्यांदरम्यान अनेक विक्रमही केले गेले. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वच संघ प्रयत्नशील आहेत. (Number of viewers watching live streaming on digital)

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामातील पहिल्या 10 सामन्यांच्या प्रेक्षकांची संख्या समोर आली आहे, ज्याने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. इंडियन प्रीमियर लीगचे अधिकृत प्रसारक डिस्ने स्टारने सांगितले की, पहिल्या 10 आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण 35 कोटी लोकांनी पाहिले.

एका आयपीएल सामन्याची कमाई संपूर्ण पाकिस्तानी लीगच्या बरोबर

2023 मध्ये, बीसीसीआयला आयपीएलचे डिजिटल आणि टीव्ही हक्क विकून 48,391 कोटी रुपये मिळाले. ही रक्कम 5 वर्षांसाठी मिळाली, म्हणजेच एका हंगामासाठी ब्रॉडकास्टर्सने 9,678 कोटी रुपये दिले. यानुसार बीसीसीआयला एक सामना दाखवण्यासाठी 119 कोटी रुपये मिळत आहेत. (Earnings per IPL match equal to that of the entire Pakistani league)

एका पीएसएल हंगामासाठी ब्रॉडकास्टर्स पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) 124 कोटी रुपये देतात. म्हणजे एका सामन्यातून 3.60 कोटी रुपये. BCCI ला महिला प्रीमियर लीग (WPL) मधील एका सामन्याचे प्रसारण करून 8.70 कोटी रुपये मिळतात, जे PSL सामन्यापेक्षा अडीच पट जास्त आहे.

ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग (BBL) प्रसारण हक्कांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ला एका सामन्यासाठी 14.50 कोटी रुपये मिळतात. या बाबतीत डब्ल्यूपीएल तिसऱ्या स्थानावर आहे आणि द हंड्रेड लीग चौथ्या स्थानावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT