JIO Customers sakal
Personal Finance

JIO Customers : महाराष्ट्रात ‘जिओ’ची ग्राहकसंख्या सर्वाधिक ; ‘दूरसंचार नियामका’चा अहवाल

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जानेवारी महिन्यात रिलायन्स जिओने महाराष्ट्रात नवे १.३९ लाख ग्राहक जोडले असून जिओची ग्राहकसंख्या, ४.३२ कोटी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जानेवारी महिन्यात रिलायन्स जिओने महाराष्ट्रात नवे १.३९ लाख ग्राहक जोडले असून जिओची ग्राहकसंख्या, ४.३२ कोटी झाली आहे. ग्राहकसंख्येच्या आधारावर जिओ महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.

व्होडाफोन- आयडिया म्हणजेच वीच्या ग्राहकसंख्येत तीन लाखांनी घट झाली आहे, तरीही २.२६ कोटी ग्राहकांसह ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारती एअरटेलने ६८ हजार नवे ग्राहक जोडले असून, २.१६ कोटी ग्राहकांसह ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत २२ हजार नव्या ग्राहकांची भर पडली आहे.

वायरलेस सब्सक्रायबर बाजारपेठेतदेखील रिलायन्स जिओ ४६.३२ टक्के ग्राहकांसह पहिल्या स्थानावर आहे .व्होडाफोन-आयडिया २४.२३ टक्के हिश्शासह दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारती एअरटेलचा वाटा २३.१२ टक्के असून, ती तिसऱ्या स्थानावर आहे. बीएसएनएल ६.३० टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

जिओने २०२३ मध्ये प्रत्येक महिन्यात ग्राहकसंख्येत वाढ नोंदवली असून जिओच्या फाइव्ह-जी सेवेलासुद्धा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच उकला या संस्थने केलेल्या पाहणीनुसार जिओच्या फाइव्ह-जी विस्तारामुळे भारताने फाइव्ह-जी सेवेत पहिल्या १५ देशांमध्ये स्थान मिळवले आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Global Warming: जागतिक तापमानवाढीचा वेग दुप्पट; पृथ्वीच्या तापमानात दशकात 0.35 अंशांनी वाढ

ना विराट, ना डिव्हिलियर्स! २१ वर्षांपासून धोनीचा हा विश्वविक्रम कायम; आजही एकाही फलंदाजाला मोडता आला नाही, श्रीलंकेविरुद्ध काय घडलं होतं?

Viral Video: ज्यांनी इमारत उभी केली, त्यांनाच लिफ्टमध्ये जागा नाही! २१ मजले डोक्यावर ओझं घेऊन चढणाऱ्या मजुराचा VIDEO पाहून डोळे पाणावतील!

Marathi News Live Updates : नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती, पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजपचे आत्मपरीक्षण

Satara Politics: जयकुमार गोरेंचे खासदार उदयनराजेंसमवेत गुफ्तगू; जलमंदिर पॅलेसमध्‍ये सदिच्‍छा भेट; मतांच्‍या बेरजेसाठी तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT