JioCinema got 18 sponsors for IPL 2024 list includes many big names from various sectors
JioCinema got 18 sponsors for IPL 2024 list includes many big names from various sectors Sakal
Personal Finance

IPL 2024: टाटा IPLमध्ये पैशांचा पाऊस! JioCinemaची होणार चांदी; कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडणार का?

राहुल शेळके

IPL 2024 JioCinema: आज 22 मार्चपासून आयपीएल 2024 चा थरार सुरू होणार आहे. आयपीएलची चमकदार ट्रॉफी जिंकण्यासाठी एकूण 10 संघ मैदानावर एकमेकांशी स्पर्धा करताना दिसणार आहेत. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

आयपीएलमध्ये एकीकडे मैदानावर वेगवेगळ्या संघांमध्ये टक्कर होणार आहे, तर दुसरीकडे मैदानापासून टीव्ही स्क्रीनपर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाहिरातीची स्पर्धा रंगणार आहे. IPLचा स्ट्रीमिंग पार्टनर Jio Cinema ला याचा खूप फायदा होणार आहे.

JioCinema आणि Tata हे IPL 2024 चे अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार आहेत, IPL हंगामासाठी 18 स्पॉन्सर आणि 250 हून अधिक जाहिरातदार मिळाले आहेत. आयपीएलच्या डिजिटल स्ट्रीमिंगमध्ये जाहिराती देण्यासाठी कंपन्या रांगेत उभ्या आहेत. (Tata IPL 2024 jio cinema gets record 18 sponsors and 250 advertisers)

एवढ्या मोठ्या संख्येने जाहिरातदार मिळणे हा एक विक्रमच आहे. ऑटोमोबाईल, मोबाईल हँडसेट, बँकिंग, ऑनलाइन ब्रोकिंग आणि ट्रेडिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी ही यादी भरलेली आहे. आयपीएलच्या शेवटच्या सीझनमध्ये JioCinema ने लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये विक्रमी कमाई केली होती.

जिओ सिनेमाला विक्रमी कमाई अपेक्षित आहे

जिओ सिनेमाने आयपीएलच्या शेवटच्या हंगामात लाईव्ह स्ट्रीमिंगमधून विक्रमी कमाई केली होती. मागच्या वर्षीही स्पॉन्सर आणि जाहिरातदारांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळची गर्दी पाहता, लाइव्ह स्ट्रीमिंगमधून Jio सिनेमाची कमाई गेल्या वर्षीच्या रेकॉर्डला मागे टाकेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

जिओ सिनेमाला आशा आहे की आयपीएलच्या या सीझनमध्ये जाहिराती करणाऱ्या कंपन्या आणि प्रायोजकांची यादी आणखी मोठी होऊ शकते. किंबहुना स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे त्यांचा आवाका अधिक व्यापक झाला आहे.

अशा परिस्थितीत पारंपारिक टीव्हीच्या तुलनेत डिजिटल माध्यमातून आयपीएल पाहणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. दर्शकांची विक्रमी संख्या लक्षात घेऊन कंपन्या डिजिटल ब्रॉडकास्टिंगमध्ये जाहिरात करण्यासाठी स्पर्धा करत आहेत.

स्पॉन्सरमध्ये कोणत्या कंपन्यांचा समावेश आहे?

जाहिरातदारांच्या यादीमध्ये Tata Motors, HDFC बँकेचे PayZap, SBI, Cred, AMFI, Upstox, Thums Up, Britannia, Pepsi, Parle, Google Pixel, Haier, जिंदाल स्टील, व्होडाफोन, दालमिया सिमेंट्स, कमला पसंद आणि रॅपिडो यांचा सहयोगी प्रायोजक म्हणून समावेश आहे. प्रायोजकांची यादी अजून मोठी असू शकते, कारण जिओसिनेमा इतर अनेक कंपन्यांशी बोलणी करत आहे.

12 भाषांमध्ये आयपीएलचे होणार समालोचन

टाटा आयपीएल 2024 ची सुरुवात 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामन्याने होईल. प्रेक्षक 12 भाषांमध्ये या नवीन सीझनचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही 4K सारख्या व्हिडिओ गुणवत्तेतही सामना विनामूल्य पाहू शकाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT