JP Morgan upgrades India Sakal
Personal Finance

JP Morgan: मॉर्गन स्टॅनली नंतर आता जेपी मॉर्गनने भारताचे रेटिंग केले अपग्रेड, EM मॉडेल पोर्टफोलिओमध्ये 3 शेअर्सचा समावेश

JP Morgan upgrades India: इन्व्हेस्टमेंट बँकर आणि ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने भारताला अपग्रेड केले आहे.

राहुल शेळके

JP Morgan Upgrades India: इन्व्हेस्टमेंट बँकर आणि ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने भारताला अपग्रेड केले आहे. ग्लोबल बँकेने भारताला 'न्यूट्रल' वरून 'ओव्हरवेट' केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सकारात्मक वातावरण, इमर्जिंग मार्केट्स (EM), GDP मधील वाढ आणि बॉन्ड मार्केट सुधारणे या अनेक कारणांमुळे ब्रोकरेज फर्मने भारताला अपग्रेड केले गेले आहे.यापूर्वी मॉर्गन स्टॅनली, सीएलएसए आणि नोमुरा यांनीही भारताला अपग्रेड केले आहे.

या 3 मोठ्या शेअर्सचा पोर्टफोलिओमध्ये समावेश

ब्रोकरेज हाऊसने तीन शेअर्सचा EM मॉडेल पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे. यात सन फार्मा, बँक ऑफ बडोदा आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांची नावे आहेत.

याआधी, मॉर्गन स्टॅन्लेने आर्थिक आणि कमाईच्या वाढीतील सुधारणांमुळे भारताचे रेटिंग ओव्हरवेटवर अपग्रेड केले होते. CLSA ने भारतातील पोर्टफोलिओ 20 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत.

जेपी मॉर्गनने गेल्या महिन्यात भारताचा जून 2024 पासून इमर्जिंग मार्केट डेट इंडेक्स (GBI-EM) मध्ये समावेश करणार आहे. या निर्णयानंतर जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत अब्जावधी डॉलर्सचा ओघ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परदेशी गुंतवणूकदार भारताबद्दल उत्साही दिसतात कारण देशाची आर्थिक वाढ अनेक प्रतिस्पर्धी देशांच्या पुढे आहे. भारताचा भू-राजकीय प्रभाव वाढत आहे आणि Apple Inc.सह अनेक जागतिक कंपन्या चीनला पर्याय शोधत आहेत, म्हणजेच त्यांना चीन सोडून दुसऱ्या देशात जायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT