Insurance Policy New Rules From 1 April  Sakal
Personal Finance

Insurance Policy Rules: विमा क्षेत्राशी संबंधित नियम 1 एप्रिलपासून बदलणार, सर्वसामान्यांवर असा होणार परिणाम

Insurance Policy New Rules: 1 एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच विमा क्षेत्राशी संबंधित अनेक नियमही बदलणार आहेत.

राहुल शेळके

Insurance Policy New Rules From 1 April : 1 एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच विमा क्षेत्राशी संबंधित अनेक नियमही बदलणार आहेत. यामध्ये, विशिष्ट प्रकारच्या विम्यांमधून कर कपातीचा लाभ काढून टाकण्यापासून इतर अनेक बदल होणार आहेत.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला येत्या आर्थिक वर्षात विमा क्षेत्रात काय बदल होणार आहेत आणि त्याचा सर्वसामान्यांवर कसा परिणाम होणार आहे हे सांगणार आहोत. (Latest Marathi News)

5 लाखांपर्यंतच्या प्रीमियमवर कर आकारला जाईल :

1 एप्रिल 2023 पासून, 5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम असलेल्या आयुर्विमा उत्पन्नावर आता कर भरावा लागेल, जो पूर्वी करमुक्त होता. या मर्यादेपलीकडे प्रीमियम उत्पन्नावर अवलंबून असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी नाही. (Marathi Tajya Batmya)

युनिट लिंक्ड विमा योजना नवीन आयकर नियमांपासून दूर ठेवण्यात आल्या आहेत आणि त्यांना कर सवलती मिळत राहतील.

खर्च आणि कमिशन मर्यादेत बदल :

इन्शुरन्स रेग्युलेटरने एक्सपेन्सेस ऑन मॅनेजमेंट (EOM) आणि उद्योगासाठी कमिशन मर्यादा सुधारित केल्या आहेत, ज्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने एजंट आणि ब्रोकर्स यांना कमिशन पेमेंटवरील मर्यादा काढून टाकली आहे.

यापूर्वी 2022 मध्ये, IRDAI ने 'एक्सपोजर ड्राफ्ट' मध्ये एजंट्सच्या कमिशनवर 20 टक्के मर्यादा प्रस्तावित केली होती.

विम्या व्यतिरिक्त अनेक मोठे बदल 1 एप्रिल पासून होणार आहेत. यामध्ये बाजार नियामक सेबी (SEBI) ने सर्व म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना 31 मार्चपूर्वी त्यांचे नामांकनाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

तसे करण्यात अयशस्वी झाल्यास, 1 एप्रिल 2023 पासून, गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ बंद केला जाईल.

तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल तर डिमॅट खातेधारकांनी 1 एप्रिल 2023 पूर्वी नामांकन दाखल करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास खातेधारकांचे खाते बंद केले जाईल. सेबीच्या परिपत्रकानुसार, डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यात नॉमिनी जोडणे आवश्यक आहे. तसे न केल्यास तुमचे खाते निष्क्रिय केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: आधार अपडेटसाठी नागरिकांची धांदल; ई-केवायसी करण्यासाठी केंद्रांवर लाडक्या बहिणींच्या लागताहेत रांगा

Mumbai News: लिंक रोडसाठी १,०३९ झाडांवर कुऱ्हाड, सर्वोच्च न्यायालयाची मुंबई पालिकेला सशर्त परवानगी

Kolhapur News: ‘मी नाही तर माझा वारस!’ घराणेशाहीचा फटका कार्यकर्त्यांना; ९ नगरपालिकांत नेत्यांच्या कुटुंबीयांचीच उमेदवारी

Latest Marathi Breaking News : हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

Mukesh Ambani : 31,000 कोटींच्या बाजारात मुकेश अंबानी करणार गुंतवणूक! दोन वर्षात बाजार होणार दुप्पट!

SCROLL FOR NEXT