LIC Policy sakal
Personal Finance

LIC Scheme: LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये महिलांना मिळू शकतो 11 लाखांचा परतावा! दररोज किती गुंतवणूक करावी लागेल?

LIC Aadhaar Shila Plan: छोटी गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मोठी रक्कम मिळवू शकता.

राहुल शेळके

LIC Aadhaar Shila Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. एलआयसीने विशेषतः महिलांसाठी अनेक योजना आखल्या आहेत. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो.

या योजनेचे नाव LIC आधार शिला योजना आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही दररोज फक्त रु 87 ची छोटी गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मोठी रक्कम मिळवू शकता.

एलआयसी आधारशिला योजनेबद्दल जाणून घ्या-

LIC आधार शिला योजना ही वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात.

या पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, गुंतवणूकदाराला निश्चित रक्कम मिळते. दुसरीकडे, पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.

कोण गुंतवणूक करू शकतो?

या योजनेत केवळ आधार कार्ड असलेल्या महिलाच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेचे वय 8 ते 55 वर्षे दरम्यान असावे. तुम्ही ही पॉलिसी 10 वर्षे ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी करू शकता.

मॅच्युरिटीच्या वेळी, स्त्रीचे कमाल वय 70 वर्षे असू शकते. या प्रकरणात, वयाच्या 55 व्या वर्षी, तुम्ही फक्त 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्हाला 2 लाख रुपयांपासून कमाल 5 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळू शकते.

11 लाख रुपये कसे मिळवायचे-

मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला LIC आधार शिला पॉलिसीद्वारे 11 लाख रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला दररोज 87 रुपये गुंतवावे लागतील.

यामध्ये वार्षिक 31,755 रुपये प्रीमियम आकारला जाईल. यामध्ये 10 वर्षांच्या कालावधीतील एकूण ठेव रक्कम रु 3,17,550 असेल. जर तुम्ही वयाच्या 70 व्या वर्षी पैसे काढले तर तुम्हाला 11 लाख रुपयांचा निधी मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT