LIC cuts stake in 16 PSU stocks as portfolio soars to Rs 14 lakh crore  Sakal
Personal Finance

LIC Cuts Stake: एलआयसीने 16 सरकारी कंपन्यांमधील हिस्सा केला कमी; काय आहे कारण?

LIC Cuts Stake: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही शेअर बाजारात गुंतवणूक करणारी सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 300 शेअर्स आहेत. अलीकडे, एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये बदल झाला आहे

राहुल शेळके

LIC Cuts Stake: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही शेअर बाजारात गुंतवणूक करणारी सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 300 शेअर्स आहेत. अलीकडे, एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये बदल झाला आहे LIC ने 16 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील गुंतवणूक कमी केली आहे.

LIC ने एकूण 80 शेअर्समध्ये आपला हिस्सा कमी केला आहे. जानेवारी-मार्च तिमाहीच्या अखेरीस, शेअर बाजारातील त्याची एकूण हिस्सेदारी सुमारे 14 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यानंतर एलआयसीच्या शेअर होल्डिंगमध्ये बदल झाला आहे.

एलआयसीने 16 सरकारी कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. यापैकी बहुतेकांनी गेल्या एका वर्षात 10 टक्क्यांहून अधिक म्हणजे दुहेरी अंकी परतावा दिला आहे. असे असतानाही एलआयसीने या कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. LIC ने 2024 मध्ये एकूण शेअर गुंतवणुकीतून एकूण 1.6 लाख कोटी रुपये कमावले आहेत. याचा अर्थ एलआयसीने प्रॉफिट बुकिंग केला आहे.

LIC ने BHEL, सेल, कोल इंडिया, ऑइल इंडिया, महानगर गॅस, मंगलोर ऑइल, SBI, कॅनरा बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम, NMDC, NMDC स्टील, शिपिंग कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल, कंटेनर कॉर्पोरेशन, ONGC आणि NTPC मधील आपला हिस्सा कमी केला आहे.

LIC ने यापैकी काही शेअर्समध्ये आपली हिस्सेदारी कमी करून इतर अनेक कंपन्यांमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. रेखा झुनझुनवाला किंवा राधाकृष्ण दमानी यांच्या पोर्टफोलिओवर लोक ज्या प्रकारे लक्ष ठेवतात त्याचप्रमाणे इतर गुंतवणूकदार एलआयसीच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवतात, कारण बाजाराच्या भविष्याचा अंदाज लावणे सोपे होते.

अहवालानुसार, एलआयसीने अनेक सरकारी कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. यामध्ये NLC, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, बँक ऑफ बडोदा, NHPC, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, सतलज जल विद्युत निगम, IRCTC, पॉवर ग्रीड आणि रेल विकास निगम यांचा समावेश आहे.

याशिवाय एलआयसीने टाटा पॉवर, वेदांत, जेएसडब्ल्यू एनर्जी, व्होल्टास, टाटा मोटर्स, एल अँड टी, नवीन फ्लोरिन, बाटा इंडिया, स्वान एनर्जी, इन्फोसिस, नेस्ले, अपोलो टायर्स, एशियन पेंट्स, एल अँड टी माइंडट्री, पतंजली फूड्स या खासगी क्षेत्रातील कंपन्यांशी भागीदारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT