LIC fourth largest insurer in the world based on reserves S&P Global study  Sakal
Personal Finance

LIC: एलआयसी जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी, पहिल्या क्रमांकावर कोण?

LIC: जगातील टॉप 50 विमा कंपन्यांच्या यादीत LIC ही एकमेव भारतीय कंपनी आहे.

राहुल शेळके

LIC: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या क्रमवारीत जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी बनली आहे. देशातील या सरकारी विमा कंपनीच्या तुलनेत Allianz SE, चायना लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी पुढे आहे.

एलआयसीचा रोख साठा 503.7 अब्ज डॉलर्स होता. तर Allianz SE चा रोख साठा 750.20 अब्ज डॉलर्स, चायना लाइफ इन्शुरन्स कंपनीचा रोख साठा 616.90 अब्ज डॉलर्स आणि निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनीचा रोख साठा 536.80 अब्ज डॉलर्स होता. जगातील टॉप 50 विमा कंपन्यांच्या यादीत LIC ही एकमेव भारतीय कंपनी आहे.

जगातील टॉप 50 जीवन विमा कंपन्यांच्या यादीत 21 कंपन्यांसह युरोपचे वर्चस्व आहे. तर अमेरिकेत जीवन विमा कंपन्या सर्वाधिक आहेत. आठ विमा कंपन्यांचे मुख्यालय अमेरिकेत आहे. यानंतर सात कंपन्यांसह ब्रिटन दुसऱ्या स्थानावर आहे.

युरोपीय देशांप्रमाणेच जगातील टॉप 50 आशियाई कंपन्यांपैकी 17 कंपन्यांचा जीवन विमा क्षेत्रात सहभाग होता. पाच विमा कंपन्यांसह चीन आणि जपान या यादीत आहेत. अमेरिकेतील आठ, कॅनडामधील दोन आणि बर्म्युडामधील दोन कंपन्यांसह उत्तर अमेरिका 12 व्या क्रमांकावर आहे.

मे 2023 मधील एका अहवालानुसार, LIC कंपनीचा स्टॉक मार्केटमध्ये 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पोर्टफोलिओ आहे. कंपनीने शेअर बाजारातील 273 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, LIC च्या 12 शेअर्सनी 2023 मध्ये 20 टक्के परतावा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT