Retirement google
Personal Finance

Retirement Plan : दरमहा ११ हजार पेन्शन हवी असेल तर या योजनेत लगेच गुंतवणूक करा

यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनाचा लाभ घेऊ शकता. LIC ने गेल्या काही महिन्यांत आपल्या नवीन जीवन शांती योजनेसाठी दर सुधारित केले होते.

नमिता धुरी

मुंबई : सरकारी नोकरी असो वा खासगी नोकरदार, सगळ्यात मोठी चिंता निवृत्तीची असते. निवृत्तीनंतर दर महिन्याला एकरकमी पैसे मिळत राहिले तर आयुष्य आरामात जाते. अशा स्थितीत नोकरी करण्यासोबतच पेन्शनचीही व्यवस्था करणे आवश्यक आहे.

LIC जीवन शांती पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ११ हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. या योजनेत गुंतवणूक केल्यास अनेक फायदे मिळतात. (LIC jeevan shanti policy retirement plan)

यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनाचा लाभ घेऊ शकता. LIC ने गेल्या काही महिन्यांत आपल्या नवीन जीवन शांती योजनेसाठी दर सुधारित केले होते. याअंतर्गत आता या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या नवीन पॉलिसीधारकांना अधिक व्याज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवू शकता.

अशा प्रकारे तुम्हाला पेन्शन मिळेल

LIC ची नवीन जीवन शांती पॉलिसी एक नॉन लिंक्ड प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. पॉलिसीधारकाला पेन्शन कधी घ्यायची आहे याचेही पर्याय प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. ५, १०, १५ किंवा २० वर्षांनंतर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.

पेन्शन ग्राहकाने निवडलेल्या वेळेनुसार सुरू होईल. एलआयसीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दरमहा पेन्शन मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम मिळू शकते. ज्यांना एकरकमी रक्कम जमा करून तात्काळ पेन्शन मिळवायचे आहे ते देखील याचा लाभ घेऊ शकतात.

योजनेनुसार, सिंगल लाइफसाठी डिफर्ड अॅन्युइटीच्या बाबतीत, तुम्हाला १० लाख रुपयांची पॉलिसी खरेदी करून ११ हजार १९२ रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. डिफर्ड अॅन्युटीसाठी मासिक पेन्शन रु. १० हजार ५७६ असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT