l & t - Bajaj partnership sakal
Personal Finance

l & t - Bajaj partnership : ‘एल अँड टी फायनान्स’ची ‘बजाज मार्केट्स’शी भागीदारी

गृहकर्ज आणि मालमत्तेवर आधारित कर्जपुरवठ्यासाठी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी ‘एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज’ आणि वित्तीय कंपनी ‘बजाज मार्केट्स’ यांनी धोरणात्मक भागीदारी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गृहकर्ज आणि मालमत्तेवर आधारित कर्जपुरवठ्यासाठी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी ‘एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज’ आणि वित्तीय कंपनी ‘बजाज मार्केट्स’ यांनी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीतून दोन्ही कंपन्या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन विविध प्रकारच्या कर्जांचा पुरवठा करणार आहेत. यात वैयक्तिक कर्जासह दुचाकी कर्जाचाही समावेश आहे.

‘एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज’च्या शहरी वित्तपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गरयाली म्हणाले, ‘‘बजाज मार्केट्ससोबतच्या भागीदारीमुळे आम्ही गृहकर्ज सेवा व्यापक करू शकणार आहोत;

तसेच दोन्ही कंपन्यांचे सामूहिक कौशल्य आणखी उंचावणार आहे.’’ या भागीदारीमुळे ग्राहकांना आता ‘बजाज मार्केट्स’कडे कर्ज, क्रेडिट कार्ड, विमा व गुंतवणुकीचे पर्याय अशा सेवा उपलब्ध होतील; तसेच कर्जदार कर्जपरतफेडीची मुदत २५ वर्षापर्यंत वाढवू शकतील. वार्षिक ८.६० टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या स्पर्धात्मक व्याजदराचाही लाभ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS नेत्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या, डोक्यात मारली गोळी; भरदिवसा घडलेल्या घटनेनं खळबळ, CCTVमध्ये हल्लेखोर कैद

Nashik Crime: "माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर पुस्तकातील नावांपैकी एकाचा बळी..."; अत्याचाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, काय घडलं?

Delhi Blast Plan : काय आहे Dead Drop ईमेल? जे वापरुन दहशतवाद्यांनी दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचला..समोर आला धक्कादायक प्लॅन

Long Life Science Formula: शतीयुषी भव! आता १०० नाही १५० वर्ष जगा; शास्त्रज्ञांनी शोधुन काढला नवा फॉर्म्युला

Latest Marathi Breaking News Live : नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन, परिसरात सर्च ऑपरेशन

SCROLL FOR NEXT