Maharashtra becomes largest economy in India What is the share of Gujarat, Uttar Pradesh  Sakal
Personal Finance

Maharashtra GDP: भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा; गुजरात, उत्तर प्रदेशचा वाटा किती?

Maharashtra GDP: देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढत आहे.

राहुल शेळके

Maharashtra GDP: शिंदे सरकारसाठी आनंदाची बातमी आहे. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुंतवणूक आणि शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या प्रमुख ऑनलाइन ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म soic.inच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

देशाच्या एकूण जीडीपीमध्ये 15.7 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे तर उत्तर प्रदेश 9.2 टक्के, तामिळनाडू 9.1 टक्के, गुजरात 8.2 टक्के आणि पश्चिम बंगाल 7.5 टक्के, कर्नाटक 6.2 टक्के, राजस्थान 5.5 टक्के, आंध्र प्रदेश 4.9 टक्के आणि मध्य प्रदेशचा वाटा 4.6 टक्के आहे.

सध्या देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढत आहे. राज्याचा जीडीपी 430 अब्ज डॉलर्स आहे. जीडीपी वाढीचा अंदाजे दर हा साडेआठ टक्के आहे. महाराष्ट्र सरकारने 2030 पर्यंत आपली अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

हे लक्ष्य गाठण्यासाठी राज्याला अर्थव्यवस्था 11 टक्के वेगाने वाढवावी लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रावर सर्वाधिक काम करावे लागणार आहे.

एक ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठणारे महाराष्ट्र राज्य पहिले ठरू शकते. याचे कारण या राज्यात औद्योगिक उत्पादन देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहराचा जीडीपी देशात सर्वाधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT