maharashtra industry minister said on conflict over Surat Diamond Bourse surat  Sakal
Personal Finance

Diamond Hub: देशातील सर्वात मोठे डायमंड हब मुंबईतच होणार; विरोधकांच्या टिकेवर उद्योगमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Uday Samant: सुरत डायमंड बोर्समुळे राज्याचे राजकारण तापले आहे.

राहुल शेळके

Uday Samant: सुरत डायमंड बोर्समुळे (SDB) राज्याचे राजकारण तापले आहे. हिरे उद्योगासाठी सुरतमध्ये ही भव्य इमारत बांधण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील हिरे बाजार गुजरातकडे वळवला जाईल, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.

सुरतमध्ये बांधलेल्या सूरत डायमंड बोर्समुळे मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मिळणारा पैसा आता मिळणार नाही. कारण मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद करून सुरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यावरुन राज्यातील विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर टिका केली होती.

विरोधकांच्या आरोपांवर आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. येत्या वर्षभरात नवी मुंबईत देशातील सर्वात मोठे डायमंड सेंटर सुरू होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यासाठी धोरण तयार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले, डायमंड हिरे ज्वेलरी हब नवी मुबंईतच होईल, अन्य लोक टार्गेट करून बोलत आहेत, गैरसमज निर्माण करत आहेत.

देशातील मुंबई आणि सुरत या शहरांमध्ये हिरे उद्योगासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळेच सुरतमध्ये सूरत डायमंड बोर्स सुरू होत असताना महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सरकारवर निशाणा साधत आहे.

जगातील 70-80 टक्के हिऱ्यांच्या व्यापारावर भारतीयांचे नियंत्रण आहे. सुरत डायमंड बोर्स येथे वन स्टॉप सोल्युशन म्हणून जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. सुरत डायमंड बाजाराचा दुसरा टप्पाही प्रस्तावित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT