Maharashtra Revenue sakal
Personal Finance

Maharashtra Revenue : ‘जीएसटी’ संकलनात महाराष्ट्र अव्वल ; ‘जीएसटी’ लागू झाल्यापासून प्रथम स्थान कायम

मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन करून अव्वल स्थान मिळवले आहे. देशाच्या एकूण वार्षिक ‘जीएसटी’ संकलनात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन करून अव्वल स्थान मिळवले आहे. देशाच्या एकूण वार्षिक ‘जीएसटी’ संकलनात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के आहे.

मार्च महिन्यात राज्यात २७,६८८ कोटी रुपयांचे ‘जीएसटी’ जमा झाला. या वर्षातील हे दुसरे सर्वाधिक संकलन आहे. देशात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण २०.१८ लाख कोटी रुपयांचा ‘जीएसटी’ जमा झाला, त्यात महाराष्ट्राचा वाटा हा तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक म्हणजेच जवळपास १५ टक्के आहे.

‘जीएसटी’ प्रणाली लागू झाल्यापासून महाराष्ट्राने संकलनात पहिला क्रमांक कायम राखला आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यात २ लाख १७ हजार कोटी रुपयांचे ‘जीएसटी’ संकलन झाले. गेल्या वर्षी २०२२-२३ मध्ये ते २ लाख ७५ हजार कोटी रुपये होते.

यंदा २०२३-२४ मध्ये प्रथमच ते तीन लाख कोटी रुपयांवर गेले आहे. एप्रिल २०२३ मध्ये राज्यात सर्वाधिक ३३,१९६ कोटी रुपयांचे संकलन झाले होते. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये दुसऱ्या क्रमाकांचे संकलन झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT