Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh Dhoni Esakal
Personal Finance

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीची मुंबई इंडियन्सच्या 'रिलायन्स'सोबत नवी इनिंग, अंबानींनी बनवले...

राहुल शेळके

Mahendra Singh Dhoni: रिलायन्सच्या रिटेल फर्म जिओमार्टने भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. धोनी 45 सेकंदांच्या जाहिरातीत दिसणार आहे.

रिलायन्स रिटेलने एका निवेदनात धोनीला JioMart चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्याबाबत माहिती दिली. कंपनीने सांगितले की भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला JioMart चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवले आहे.

(Mahendra Singh Dhoni brand ambassador JioMart MS Dhoni Marathi News)

यासोबतच कंपनीने JioMart च्या फेस्टिव्ह कॅम्पेनचे नाव बदलण्याचीही माहिती दिली. ते म्हणाले की आता JioMart चे नाव बदलून 'Jio Utsav, Celebration of India' असे करण्यात आले आहे. 8 ऑक्टोबर 2023 पासून या मोहिमेची विक्री सुरू होणार आहे.

महेंद्रसिंग धोनीला JioMart चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, भारताची संस्कृती, लोक आणि सण यासाठी ओळखले जाते. JioMart ची 'जिओ उत्सव मोहीम' ही भारताच्या लोकांच्या उत्सवाचे प्रतीक आहे. JioMart सोबत जोडल्याबद्दल आणि लाखो भारतीयांच्या खरेदी प्रवासाचा भाग बनल्या बद्दल मला खूप आनंद होत आहे.

जिओमार्टचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्याबद्दल जिओमार्टचे सीईओ संदीप वरगंटी यांनी धोनीचे स्वागत केले. त्यांनी धोनीला बिहारच्या कारागीर अंबिका देवी यांनी बनवलेली मधुबनी पेंटिंग भेट दिली.

जिओ मार्टमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ब्युटी याशिवाय गृहसजावटीच्या वस्तूही उपलब्ध आहेत. यामध्ये रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स ज्वेल्स, हॅमलेसह रिलायन्स ब्रँडच्या उत्पादनांचा समावेश आहे. JioMart एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. सध्या त्यात 1,000 हून अधिक कामगार काम करतात. ते अंदाजे दीड लाख उत्पादनांची विक्री करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde : ओबीसी मेळाव्यांना अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी; धनंजय मुंडेही सोबतीला...

Latest Marathi Live Updates : पुढील ३ तासांत 'या' जिलह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

'PM Kisan'च्या 17व्या हप्त्याची घोषणा; जाणून घ्या, कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे

Cristiano Ronaldo Euro Cup 2024 : पोर्तुगालचा 39 वर्षाचा ख्रिस्तियानो रोनाल्डो युरो कपनंतर घेणार निवृत्ती?

UPSC 2024 : AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?

SCROLL FOR NEXT