Mahila Samman Savings Certificates  Sakal
Personal Finance

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र: काय आहे योजना, किती मिळणार व्याज, जाणून घ्या ६ महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Mahila Samman Savings Certificates: महिलांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या या योजनेत आता 1 एप्रिलपासून गुंतवणूक करता येणार आहे.

राहुल शेळके

Mahila Samman Savings Certificates : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात अनेक बदल झाले आहेत. या बदलांच्या दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत प्रमाणपत्रांची घोषणा केली होती.

महिलांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या या योजनेत आता 1 एप्रिलपासून गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया?

1- मुलीही या योजनेत गुंतवणूक करू शकतात का? (Mahila Samman Savings Certificates)

होय, या योजनेत महिला आणि मुली दोघेही गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलींच्या नावावर, त्यांचे पालक या योजनेचे पैसे गुंतवू शकतात.

2- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते कोठे उघडता येईल?

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते उघडले जाऊ शकते.

3- महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर किती व्याज मिळेल?

सरकारने केलेल्या घोषणेनुसार, या योजनेप्रमाणे, गुंतवणूकदारांना 7.5 टक्के व्याज दिले जाईल. हे व्याज दर तीन महिन्यांनी गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केले जाईल.

4- महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात किती गुंतवणूक करता येईल?

या योजनेंतर्गत किमान रु 1000 आणि कमाल रु 2 लाख गुंतवणूक करता येते. लक्षात ठेवा की गुंतवणूक केवळ 100 च्या पटीत असेल. उदाहरण- रु 1100, रु 1200 इ.

5- मॅच्युरिटी किती वर्षांत होईल?

ही योजना २ वर्षांसाठी आहे. जेव्हा गुंतवणूकदार हे खाते उघडेल, तेव्हा 2 वर्षानंतर, तो फॉर्म-2 द्वारे त्याचे पैसे काढू शकेल.

6- केव्हा-केव्हा खाते बंद केले जाऊ शकते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र बंद करण्याबाबत अतिशय कडक नियम करण्यात आले आहेत. ही योजना काही विशिष्ट परिस्थितीत बंद केली जाऊ शकते.

- खातेधारकाच्या मृत्यूनंतर हे खाते बंद केले जाऊ शकते.

- जर एखादा खातेदार गंभीर आजाराचा बळी ठरला किंवा त्याच्या पालकाचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत सर्व कागदपत्रे दाखवून खाते बंद केले जाऊ शकते.

- या सर्वांशिवाय, खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतरही ते बंद केले जाऊ शकते. मात्र त्यानंतर खातेदारांना केवळ 2 टक्के कमी व्याज दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal BJP Victory : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, डोनाल्ड ट्रम्पही झाले प्रभावित; पंतप्रधान मोदींचे केले खास अभिनंदन

Pune News : खाशाबा चित्रपटाच्या स्थगितीबाबत नागराज मंजूळेंसह जिओला नोटीस

Mangalwedha News : हुलजंती चेक पोस्टवरून नागरिकांचा रस्ता रोको; वाहनांच्या लागल्या रांगा

SRPF exam controversy ८५ प्रश्न कॉपी पेस्ट! SRPF भरतीला स्थगिती, पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश

DC vs CSK Live: हिटविकेट अन् झेलही! Nitish Rana ची विकेट पाहून सारे चक्रावले... चर्चा रंगली, पण सत्य काही वेगळेच...Video

SCROLL FOR NEXT