Gold-Silver rule sakal
Personal Finance

Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; चांदीची चकाकीही वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

जागतिक मागणीचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold Price Today, 13 March 2023 : सोन्या-चांदीचे भाव आज तेजीत आहेत. सोने 56,500 रुपयांच्या वर व्यवहार करत आहे. जागतिक मागणीचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून येत आहे.

देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये मौल्यवान धातूंच्या किंमती वाढत आहेत. आज जर तुम्ही सराफ बाजारात सोने खरेदीसाठी बाहेर गेला असाल तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल.

काय आहेत सोन्याचे भाव :

आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्यात चांगली वाढ झाली आहे आणि तो 56,500 रुपयांच्या पुढे गेला आहे. एमसीएक्सवर सोने 365 रुपये किंवा 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 56,515 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होते.

सोन्याची सर्वोच्च पातळी पाहिली तर आज त्यात 56,667 रुपये प्रति 10 ग्रॅमचा दर होता. दुसरीकडे, आजची नीचांकी पातळी पाहता सोन्याचा दर 56,412 रुपयांवर गेला होता.

चांदीचे भाव :

चमकदार धातू चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे आणि 645 रुपये किंवा 1.03 टक्क्यांच्या वाढीसह 63,535 रुपये प्रति किलोवर व्यवहार होत आहे. चांदीचा भाव खालच्या बाजूला 63,531 रुपये प्रति किलो तर वरच्या बाजूला 63,749 रुपये प्रति किलो होता.

जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव :

  • चेन्नई - 58,090 रुपये

  • दिल्ली - 57,370 रुपये

  • हैदराबाद - 57,220 रुपये

  • कोलकत्ता - 57,220 रुपये

  • लखनऊ - 57,370 रुपये

  • मुंबई - 57,220 रुपये

  • पुणे - 57,220 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT