Medical inflation in India reaches alarming rate of 14 percent  Sakal
Personal Finance

Medical Inflation: सर्वसामान्यांना मोठा धक्का! भारतात वैद्यकीय महागाईचा दर 14 टक्क्यांवर

Medical Inflation in India: भारतातील औषधे आणि तपासण्यांचा महागाई दर सर्वाधिक आहे.

राहुल शेळके

Medical Inflation in India: देशातील नागरिकांचा सरासरी उत्पन्नाचा मोठा भाग वैद्यकीय बिलांवर खर्च होतो. संपूर्ण आशिया खंडात भारतातील औषधे आणि तपासण्यांचा महागाई दर सर्वाधिक आहे. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.

Insurtech कंपनी Plum च्या 'Health Report of Corporate India 2023' नुसार, भारतातील वैद्यकीय महागाई दर 14 टक्क्यांवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वसामान्य नागरिकांवर वैद्यकीय खर्चाचा बोजा सातत्याने वाढत आहे.

आरोग्य सेवांच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक भार लक्षणीय वाढला आहे. अहवालात असे म्हटले आहे की भारतातील 71 टक्के लोक वैद्यकीय खर्चावर स्वतःचे पैसे खर्च करत आहेत. भारतात कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा प्रदान करणाऱ्या कंपन्या केवळ 15 टक्के आहेत.

भारतात आरोग्य सेवांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. कंपनीतील अनेक कामगार कव्हरेज घेऊ शकत नाहीत. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी सुविधा पुरवणे आवश्यक आहे.

अहवालानुसार, वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे 9 कोटींहून अधिक भारतीयांचे जीवन प्रभावित झाले आहे. त्यांच्या कमाईतील 10 टक्क्यांहून अधिक रक्कम आजारांच्या उपचारांवर खर्च केली जाते. 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य विमा सुविधांबाबत फारच कमी जागरूकता आहे.

अहवालात असेही म्हटले आहे की भारतीय लोक केवळ आरोग्य विमाच नाही तर आरोग्य तपासणी करण्यातही मागे आहेत. देशात 59 टक्के लोक आहेत ज्यांची वार्षिक आरोग्य तपासणी होत नाही. असे 90 टक्के लोक आहेत जे आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत.

यापूर्वी NITI आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की 2030 मध्ये देशातील नोकरदार लोकांची संख्या 56.9 कोटी होईल. तर 2022 मध्ये त्यांची संख्या 52.2 कोटी होती. अशा परिस्थितीत नोकरदारांची संख्या वाढत असतानाही देशात आरोग्य विमा संरक्षणात वाढ होत नाही ही चिंताजनकबाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT