Modi government Likely To Sell IDBI Bank Ahead Of Lok Sabha Elections  Sakal
Personal Finance

IDBI Bank: लोकसभा निवडणुकीपूर्वी IDBI बँक विकण्याचा सरकारचा विचार; किती कोटींची होणार डील?

IDBI Divestment Plan: 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी आयडीबीआय बँक विकण्याचा सरकारचा विचार आहे.

राहुल शेळके

IDBI Divestment Plan: 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी आयडीबीआय बँक विकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने IDBI बँकेतील हिस्सा विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सरकारने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. सरकार आयडीबीआय बँकेतील स्टेकची संभाव्य विक्री पुढील आर्थिक वर्षासाठी पुढे ढकलू शकते.

डिसेंबरपर्यंत IDBI बँकेसाठी बोली जाहीर करण्याची आणि चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच मार्च 2024 पर्यंत IDBI बँकेतील हिस्सा विकण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठीची प्रक्रियाही जुलैमध्ये सुरू झाली होती. बोली लावणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये प्रेम वत्सचे फेअरफॅक्स, कोटक महिंद्रा बँक आणि खाजगी इक्विटी गुंतवणूकदार अव्हेन्यू कॅपिटल यांचा समावेश आहे.

ही विक्री बँकेशी संबंधित असल्याने त्यावर रिझर्व्ह बँकेचा शिक्का आवश्यक आहे. सध्या, आयडीबीआय बँकेतील सरकारच्या शेअर्सच्या प्रस्तावित विक्रीला रिझर्व्ह बँकेची मंजुरी मिळालेली नाही. रिझर्व्ह बँकेशी चर्चा सुरू असून लवकरच मंजुरी मिळू शकते, असे सांगण्यात येत आहे.

सरकारने गेल्या वर्षी आयडीबीआय बँकेची अधिकृत विक्री प्रक्रिया जाहीर केली होती. बोलीदार IDBI बँकेतील 30.48% पर्यंत सरकारी हिस्सा आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा अतिरिक्त 30.24% हिस्सा खरेदी करू शकतात.

आयडीबीआय बँकेतील हिस्सा विकून 15 हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारला आशा आहे. या आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीतून 51 हजार कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आयडीबीआय बँकेशिवाय शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एनएमडीसी स्टील, बीईएमएल, एचएलएल लाईफकेअर, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि विझाग स्टील या कंपन्यांचे खाजगीकरण प्रस्तावित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT