Tomato Prices Sakal
Personal Finance

Tomato Prices: गगनाला भिडलेल्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार उचलणार मोठे पाऊल?

Tomato Prices: टोमॅटोचे भाव तीन रुपये किलोपर्यंत घसरले आहेत

राहुल शेळके

Tomato Prices: टोमॅटोच्या कमी भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करू शकते. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत देशात टोमॅटोचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत होते.

देशाच्या विविध भागात टोमॅटोच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली असली तरी आता मात्र यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

भाव तीन रुपये किलोपर्यंत घसरले आहेत

लाइव्ह मिंट या इंग्रजी पोर्टलच्या वृत्तानुसार, सरकारने उचललेल्या पाऊलांमुळे 250 रुपये किलोपर्यंत विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचा भाव आता अनेक ठिकाणी 3 ते 10 रुपये किलो झाला आहे. याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दिसून येत आहे.

कृषी मंत्रालयाच्या मते हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान टोमॅटोचे मोठे उत्पादन अपेक्षित आहे. अशा स्थितीत सप्टेंबर 2023 मध्ये टोमॅटोचे उत्पादन 9.56 लाख टन होण्याची अपेक्षा आहे. तर ऑक्टोबरमध्ये ते 13 लाख टन अपेक्षित आहे. अशा स्थितीत जास्त उत्पादन झाल्यास टोमॅटोचे भाव आणखी कमी होऊ शकतात.

मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध राज्यांमधून 10 ते 20 कोटी रुपयांचे टोमॅटो खरेदी करू शकते.

टोमॅटोच्या घसरलेल्या किंमतींबद्दल महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव झपाट्याने कमी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना खर्चाचे पैसेही मिळत नाहीत. अशा स्थितीत सरकारच्या या पाऊलामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT