Vastu Tips for Wealth Esakal
Personal Finance

Vastu Tips for Wealth: काही केल्या पैसा टिकत नाही, मग पर्स मध्ये ठेवा या वस्तू आणि पहा कमाल

आपल्या पर्समध्ये अनेकदा पैशासोबतच इतर अनेक वस्तूही ठेवलेल्या असतात. अनेकदा यातील काही वस्तू तर आपण कित्येक दिवस वापरतही नाही किंवा त्या बिनकामाच्या तरी असतात. वास्तू शास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या पर्समध्ये अजिबात ठेवू नयेत

Kirti Wadkar

Vastu Tips for Wealth: पैसा कमावणं हे जितकं कष्टाचं आणि मेहनतीचं काम असतं. त्याहून जास्त कठिण काम असतं ते पैसा योग्यरित्या वापरणं. अनेकदा घरामध्ये किंवा अनेक व्यक्तींकडे पैशाची Money भरभराट होत असते. मात्र हातात पैसा काही टिकत नाही. Money Saving Tips in Vastu shastra What to Keep in your Wallet

पैसा Money येऊनही तो टिकत नाही अशी तुम्ही अनेकांची समस्या ऐकली असेल. जर तुमच्याकडेही आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही वास्तूशास्त्रामध्ये Vastu Shastra सांगण्यात आलेले काही उपाय करून पाहू शकता. आपलं पर्स किंवा बटवा ही अत्यंत महत्वाची अशी वस्तू असते.

कारण यामध्ये आपण आपले पैसे आणि अनेकदा काही इतर महत्वाच्या वस्तूही ठेवत असतो. अलिकडे ऑनलाईन पेमेंटला Online Payment प्राधान्य दिलं जातं असलं तरी प्रत्येक व्यक्ती सोबत पर्स किंवा बटवा बाळगतेच.

आपल्या पर्समध्य अनेकदा पैशासोबतच इतर अनेक वस्तूही ठेवलेल्या असतात. अनेकदा यातील काही वस्तू तर आपण कित्येक दिवस वापरतही नाही किंवा त्या बिनकामाच्या तरी असतात. वास्तू शास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या पर्समध्ये अजिबात ठेवू नयेत. काही वस्तूंमुळे नकारात्मकता वाढू लागते आणि तुम्हाला आर्थिक नुकसान सोसोवं लागू शकतं.

यासाठी पर्समधील अशा वस्तू वेळीच हटवाव्यात. तर काही वस्तू पर्समध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे शुभफल प्राप्ती होते. शिवाय पैसा टिकण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

वास्तूशास्त्रानुसार पर्समध्ये या वस्तू ठेवू नये

वास्तूशास्त्रानुसार एखाद्या वस्तूच्या खरेदीनंतर मिळणारं बिल किंवा जुनी बिलं पर्समध्ये ठेवू नये. यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि आर्थिक तंगी ओढावते.

तसंच वास्तू शास्त्रानुसार पर्समध्ये देव देवतांचे फोटो ठेवू नये.

अनेकजण आपल्या प्रियजनांचे फोटो किंवा काही वेळेस मृत आई-वडिलांचे फोटो पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवत असतात. मात्र वास्तूशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो ठेवू नये यामुळे कर्ज वाढू शकतं.

अनेकजण पर्समध्ये पैशांच्या नोटा दुमटून ठेवतात. मात्र यामुळे वास्तू दोष निर्माण होवू शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट ओढावू शकतं.

वॉलेटमध्ये कधीही चावी ठेवू नये यामुळे व्यापारामध्ये नुकसान होवू शकतं.

तसचं पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये यामुळे आर्थित संकट निर्माण होवू शकतं.

पर्समध्ये पैशांव्यतिरिक्त औषधांच्या गोळ्या, चॉकलेट अशा वस्तूही ठेवू नये.

वॉलेटमध्ये कधीही नोटा आणि नाणी एकत्र ठेवू नये. नाणी ठेवण्यासाठी वेगळा कप्पा असावा.

जर तुमच्या वॉलेटमध्येही तुम्ही यापैकी काही वस्तू ठेवत असाल तर त्या आजच हटवा.

हे देखिल वाचा-

या वस्तू पर्समध्ये ठेवणं शुभ

तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले जातात. यासाठीच वॉलेटमध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि भरभराट होवून पैसा टिकू लागतो.

तसचं हातात पैसा टिकण्यासाठी तुम्ही तांदळाच्या काही दाण्यांना हळद लावून या अक्षता पर्समध्ये ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT