MS Dhoni duped of over Rs 15 crore by former business partners, files case  Sakal
Personal Finance

MS Dhoni: धोनीची करोडोंची फसवणूक, कॅप्टन कूलने दाखल केला FIR; काय आहे प्रकरण?

MS Dhoni: भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. धोनीच्या व्यावसायिक भागीदाराने 15 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या सौम्या बिस्वास आणि मिहिर दिवाकर यांच्याविरोधात रांची कोर्टात फौजदारी खटला दाखल केला आहे.

राहुल शेळके

MS Dhoni: भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. धोनीच्या व्यावसायिक भागीदाराने 15 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या सौम्या बिस्वास आणि मिहिर दिवाकर यांच्याविरोधात रांची कोर्टात फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

जागतिक स्तरावर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी दिवाकरने एमएस धोनीसोबत करार केला होता. त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या होत्या, मात्र मिहीर दिवाकर यांनी दिलेल्या अटी पाळल्या नाहीत.

दिवाकरला अर्का स्पोर्ट्स फ्रँचायझीची फी भरायची होती आणि नफा वाटून घ्यायचा होता, पण त्याने तसे केले नाही. यामुळे धोनीला खूप त्रास सहन करावा लागला. यामुळे धोनीचे 15 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अटींचे पालन न केल्यानंतर धोनीने 15 ऑगस्ट 2021 रोजी अर्का स्पोर्ट्सला नोटीस पाठवली होती. यासोबतच अर्का स्पोर्ट्सला दिलेले अधिकारही रद्द करण्यात आले. धोनीने त्याच्या बिझनेस पार्टनरला अनेक नोटिसा पाठवल्या होत्या, पण तरीही हे प्रकरण मार्गी लागले नाही.

विधी असोसिएट्सच्या माध्यमातून एमएस धोनीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दयानंद सिंग यांनी ही माहिती दिली आहे. अर्का स्पोर्ट्सने आपली फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे एमएसडीचे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT